

इंदापूर: संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेली इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास अजित पवार पक्षाचे भरत शहा हे नगराध्यक्षपदी 127 मतांनी विजयी झाले. शहा यांना एकूण 9825 मते, तर गारटकर यांना 9698 मते मिळाली. नगरसेवकपदाच्या वीस जागांवर राष्ट्रवादी काँग््रेासचे 14, तर कृष्णा-भीमा विकास आघाडीचे 6 जण विजयी झाले. या विजयाने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे इंदापूरवरील वर्चस्व सिद्ध झाले आहे. तसेच तब्बल वीस वर्षांनी राष्ट्रवादी काँग््रेासची नगरपरिषदेवर सत्ता आली आहे.
निकालाची घोषणा होताच मतमोजणी सुरू असलेल्या बाबा चौकात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नगराध्यक्षपदी विजयी झालेले शहा यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जेसीबी तसेच पंपाच्या साह्याने गुलालाची उधळण करण्यात आली. भरत शहा यांना उमेदवारी देऊ नये; अन्यथा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, असा पवित्रा घेत राष्ट्रवादी काँग््रेासचे जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपचे माजी आमदार यशवंत माने, प्रवीण माने, दोन्ही शिवसेना, रासप, मनसे यांची मोट बांधत त्यांनी कृष्णा-भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले. दुरंगी लढतीत विधानसभेनंतर पुन्हा मभरणे विरुद्ध पाटील, मानेफ असा सामना पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री भरणे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी भरत शहा यांना पक्षात घेऊन उमेदवारी जाहीर करीत त्यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली.
नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे सांगणे कठीण झाले होते. दोन्हीही बाजूंनी आम्हीच विजयी होणार, असा दावा केला जात होता. रविवारी (दि. 21) मतमोजणी झाली. पहिल्या फेरीत गारटकर यांनी 117 मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत भरत शहा यांनी आघाडी घेतली. शहा यांना एकूण 9825 मते, तर गारटकर यांना 9698 मते मिळाली. 127 मतांनी शहा यांचा विजय झाला. निकालानंतर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, वसंत मोहोळकर, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, मुकुंद शहा, अंगद शहा, वैशाली शहा यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. बाबा चौकातून विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. खडकपुरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करीत इंदापूरचा कारभारी श्री छत्रपती शिवाजी मित्रमंडळाच्या गणेशाचे दर्शन घेत आभार सभा पार पडली. नगरपरिषदेवर आपली सत्ता आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शहराचा वेगाने विकास केला जाईल. इंदापूरकरांनी जो विश्वास राष्ट्रवादी काँग््रेासवर टाकला, त्याला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही, असे अप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले.
अजित पवार व दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता आणली असून, नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या काळात जी आश्वासने आम्ही दिली होती, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करू. आमच्या विजयासाठी ज्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी सहकार्य करीत बळ दिले, त्यांचे व सर्व मतदारांचे इंदापूरकरांचे आभार मानतो, असे भरत शहा यांनी सांगितले. विजयी नगरसेवक व कंसात त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : राष्ट्रवादी काँग््रेास : उमेश रमेश मखरे (768), सुनीता अरविंद वाघ (923), सुनीता अमर नलवडे (796), वंदना भारत शिंदे (846), शकील मगबूल सय्यद (945), दीप्ती स्वप्निल राऊत (907), अक्षय शंकर सूर्यवंशी (835), शुभम पोपट पवार (1215), मयुरी प्रशांत उंबरे (1176), सागर सुनील अरगडे (1284), रजिया हजरत शेख (944), शोभा सुरेश जावीर (1367), शैलेश देविदास पवार (1645) आणि अनिता अनिल ढावरे (1178). कृष्णा-भीमा विकास आघाडी : अनिल सुदाम पवार (916), गणेश नंदकुमार राऊत (768), शकीला खाजा बागवान (1199), शीतल अतुल शेटे (1499), सदफ वसीम बागवान (1010) आणि सुधाकर संभाजी ढगे (972).
महिलांचा उत्साह शिगेला...
निवडणुकीचा निकाल हाती येताच माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, वैशाली शहा यांच्यासह शेकडो महिलांनी जल्लोष केला. सत्तेसाठी आम्ही निवडणूक लढवलेली नाही. इंदापूरकर म्हणून आणखी जोमाने काम करीत राहू, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केली.
इंदापूरच्या जनतेचा विजय : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भरत शहा यांच्या पाठीशी शहरातील सर्व जनता उभी राहिली. केवळ निवडणुकीपुरते एकत्र आलेल्या विरोधकांना त्यांची जागा इंदापूरच्या सुज्ञ नागरिकांनी दाखवली आहे. तब्बल वीस वर्षांनी नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग््रेासच्या विचाराचे नगराध्यक्ष आणि 14 नगरसेवक झाल्याने शहराचा विकास आणखी जोमाने करू, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.