Bhigwan Bridge Road Damage: शिर्सूफळ-भिगवण मार्गावरील पुल धोकादायक; मोठी भगदाडे, प्रवाशांचा जीव मुठीत

अर्धवट कामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुलाची अवस्था बिकट; तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
Bhigwan Bridge Road Damage
Bhigwan Bridge Road DamagePudhari
Published on
Updated on

शिर्सूफळ: बारामती तालुक्यातील शिर्सूफळ-पारवडी हद्दीतील शिर्सूफळ-भिगवण मार्गावरील पुलाला मोठी भगदाडे पडल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग््राामस्थांत तीव नाराजी व्यक्त होत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bhigwan Bridge Road Damage
Hadapsar Illegal Liquor Handbhatti Crackdown: हडपसरमध्ये हातभट्टी दारूवर शिवसेनेची धडक कारवाई

सुपे आणि पालखी महामार्गाकडून भिगवणकडे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच बारामती ॲग््राो कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठीही या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे हा रस्ता कायम वर्दळीचा असतो.

Bhigwan Bridge Road Damage
Pune Illegal Handbhatti Liquor Network: पुणे जिल्ह्यात हातभट्टी दारूचा सुळसुळाट; कारवाईनंतरही स्थिती जैसे थे

गेल्या वर्षी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी विविध ठिकाणी पुलांची कामे करण्यात आली होती. मात्र, कामे अर्धवट अवस्थेतच बंद पडल्याने पुलाची स्थिती अधिकच कमकुवत झाली. दुर्लक्षामुळे पुलाच्या मधोमध मोठी भगदाडे पडली असून, सध्या नागरिक जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करत आहेत. परिस्थिती गंभीर बनल्याने हा मार्ग लवकरच वाहतुकीस बंद करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bhigwan Bridge Road Damage
Pune Illegal Liquor Crackdown: पुण्यात हातभट्टी दारूचा विळखा; 19 मृत्यूनंतर कारवाईला वेग

रुंदीकरणाची कामे सुरू करून ती अर्धवट सोडल्याने पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बांधकाम विभागाने वेळेत दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bhigwan Bridge Road Damage
Eminent Icons Award: पुण्यात ‘एमिनेंट आयकॉन्स’ पुरस्कार सोहळा उत्साहात पार

‌‘या समस्येकडे प्रशासन लक्ष देत नाही. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. तातडीने पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा होणाऱ्या अपघातास प्रशासन जबाबदार राहील,‌’ असा इशारा ग््राामस्थ संजय आटोळे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news