दत्तात्रय नलावडे
वेल्हे : छत्रपती शिवाजी महाराजांना तोलामोलाची साथ देऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पानशेत जवळील शिरकोली (ता. राजगड) येथील श्री शिरकाईदेवी च्या नावाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच 7/12 चे उतारे तयार करण्यात आले आहेत.
देवीच्या मंदिरासह परिसरातील वहिवाटीच्या जमिनीचे 7/12 उतारे शिरकाईदेवी देवस्थानच्या व शिरकोली गावठाणाच्या नावावर व्हाव्यात यासाठी ग््राामस्थांनी तब्बल तीन दशके लढा दिला, त्यासाठी जिल्हा परिषद, लोकसभा आशा सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला. अखेर ग््राामस्थांच्या लढ्याला आज बुधवारी (9 ) यश मिळाले. (Latets Pune News)
शिरकोलीचे ग््रााम महसूल अधिकारी रविकिरण पाटील यांनी देवस्थान व गावठाणाची नोंद केलेले गट क्रमांक 66 382,61,381 ,65 चे 7/12 चे उतारे शिरकाई देवस्थानचे सचिव व शिरकोलीचे सरपंच अमोल पडवळ व देवस्थानचे विश्वस्त नामदेव पडवळ यांच्याकडे सुपूर्द केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात श्री शिरकाई देवीच्या पूजा-अर्चा, सण उत्सवासाठी कायम इनाम जमीन दिली होती. या जमिनीत देवीचे शिवकालीन मंदिर, सभामंडप, देवराई होती, त्यानंतर बिटिश राजवटीत 1834 मध्ये निर्माण झालेल्या फॉरेस्टमध्ये देवराईसह निम्म्याहून अधिक जमीन गेली, त्यानंतर 1957 मध्ये बांधण्यात आलेल्या पानशेत धरणात देवीचे मंदिर व परिसरातील ऐतिहासिक वास्तू,जमीन बुडाल्याने स्थानिक ग््राामस्थ, भाविकांनी धरण तिरावर तात्पुरते मंदिर बांधून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्या वेळी पाटबंधारे विभागाने देवीच्या मंदिरासह गावठाणासाठी जमीन संपादन केली. या जमिनीवर पाटबंधारे विभागाने देवीचे पक्के मंदिर उभारले. मात्र संपादन केलेल्या जमिनीचे 7/12 उतारे शिरकाई देवस्थानच्या नावे नसल्याने मंदिर व परिसरात शासकीय निधीतून विकास कामे करण्यात अडचणी निर्माण झाल्या.
सरपंच अमोल पडवळ यांच्यासह माऊली साळेकर, शिवाजी पडवळ, नामदेव पडवळ , शंकर पडवळ आदी ग््राामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत, भूमि अभिलेख, राजगड तहसील आदी कार्यालयात दोन अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला .देवीच्या व गावठाणाच्या नावाने 7/12 उतारे तयार करण्यासाठी देवस्थान, ग््राामस्थांनी दिलेल्या लढ्याला यश मिळाले.
राजगड तालुका तहसीलदार निवास ढाणे व राजगड तालुका भूमि अभिलेख निरीक्षक एस.ए. निगडे तसेच महसूल,भूमि अभिलेख विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तांत्रिक, कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी, जागेची समक्ष पाहणी करून देवीच्या शिवकालीन इनाम जमिनीची सरकार दफ्तरी नोंद केली. सहा एकर जमीन देवी व गावठाणच्या नावे करण्यात आली आहे.