Pune Shinde Shiv Sena: पुण्यात शिंदेसेनेत संघटनात्मक फेरबदल; निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची पदे जाणार, नव्या चेहऱ्यांना संधी

उदय सामंत आणि सचिन अहिर यांचे संकेत; आठ ते दहा दिवसांत नियुक्त्यांचे चित्र स्पष्ट होणार, पुणे शहरासह जिल्ह्यात बदलांची तयारी
Shiv Sena
Shiv SenaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) पक्षाने पुणे शहर आणि जिल्ह्यात संघटनात्मक पुनर्बांधणीची तयारी सुरू केली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा तपासून संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची पदावरून उचलबांगडी केली जाणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत या बदलांचे चित्र स्पष्ट होईल. काही पदाधिकाऱ्यांना बढती मिळणार असल्याचे संकेत मंत्री उदय सामंत आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी गुरुवारी पुण्यात दिले.

Shiv Sena
Gold Silver Price Fall: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! दहा दिवसांत सोने १२ हजारांनी, चांदी २४ हजारांनी स्वस्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिवसेनेने आतापासूनच संघटनात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत आणि सचिन अहिर यांनी शहरातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाच्या सद्यस्थितीचा आणि संघटनात्मक कामगिरीचा आढावा घेतला. महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, युवासेना महानगरप्रमुख हेमंत बागुल यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Shiv Sena
Pune Timber Market Fire Victims: टिंबर मार्केटच्या आगीत संसार उद्ध्वस्त; राखेच्या ढिगाऱ्यात भविष्य शोधण्याची वेळ!

पुणे शहराबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेत बदल करण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यासाठी विविध स्तरांवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. त्यांची मते आणि सूचना जाणून घेतल्यानंतर नव्या नियुक्त्यांचा निर्णय घेतला जाईल, असे सचिन अहिर यांनी स्पष्ट केले.

Shiv Sena
Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केट आगीचे कारण गुलदस्त्यात; ४५ दुकाने, सहा घरे खाक

महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेऊन संघटनेतील त्रुटी दूर करण्यासह पक्षाचा जनाधार वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनात्मक विस्तार करताना महायुतीतील घटक पक्षांशी संघर्ष होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. पक्षाला संघटना वाढविण्याचा पूर्ण अधिकार असून, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून नियुक्त्यांबाबत निर्णय घेतले जातील, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Shiv Sena
Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केटच्या आगीने अग्निसुरक्षेचे पितळ उघडे; २०२३ च्या दुर्घटनेतूनही धडा नाही!

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा विषय नाही

दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर सचिन अहिर यांनी सध्या असा कोणताही विषय नसल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील प्रकरण सुरू असल्याने एकत्रीकरणाचा प्रश्न सध्या चर्चेत नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे किंवा सर्वोच्च पदावर विराजमान व्हावे, अशी इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त करण्यात गैर काय, असा सवाल उदय सामंत यांनी केला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनाही आपला नेता सर्वोच्च पदावर असावा, असे वाटणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जरांगे प्रकरणात फडणवीसांवर विश्वास

मनोज जरांगे-पाटील यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिपच्या वादावर बोलताना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त केला. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. मराठा समाजातील तरुणांना नोकरी मिळण्याच्या मुद्द्यावर कालच जरांगे-पाटील यांच्याशी आपले बोलणे झाले, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.