Gold Silver Price Fall: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! दहा दिवसांत सोने १२ हजारांनी, चांदी २४ हजारांनी स्वस्त

डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांची नफावसुली कारणीभूत; लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा, खरेदीबाबत संभ्रम कायम
Gold Silver Price Crash
Gold Silver Price CrashPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकी डॉलरची मजबुती आणि गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या नफावसुलीमुळे मौल्यवान धातू असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना आता उतरती कळा लागली आहे. गुरुवारी (दि. १९) सोन्याच्या दरात तोळ्यामागे दीड हजार, तर चांदीच्या दरात किलोमागे तीन हजार रुपयांची घसरण झाली.

Gold Silver Price Crash
Pune Timber Market Fire Victims: टिंबर मार्केटच्या आगीत संसार उद्ध्वस्त; राखेच्या ढिगाऱ्यात भविष्य शोधण्याची वेळ!

विशेष म्हणजे, दहा दिवसांत सोने १२ हजारांनी, तर चांदी तब्बल २४ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी दर आणखी कमी होण्याच्या शक्यतेने अनेकांनी खरेदीसाठी प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे. मागील महिनाभरापासून दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. महिनाभरापूर्वीच दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख ४६ हजार ४०६ रुपये होता. १९ नोव्हेंबरपर्यंत त्यात १६ हजार रुपयांची घट होऊन तो एक लाख २९ हजार रुपयांवर आला.

Gold Silver Price Crash
Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केट आगीचे कारण गुलदस्त्यात; ४५ दुकाने, सहा घरे खाक

त्याचप्रमाणे प्रतिकिलो दोन लाख नऊ हजार रुपयांवर असलेली चांदी ४४ हजारांनी स्वस्त होऊन एक लाख ६१ हजार रुपयांवर आली. हे दर जीएसटीविना आहेत. गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या सोने-चांदीच्या किमती कमी होऊ लागल्याने सराफ बाजारात खरेदीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Gold Silver Price Crash
Pune Timber Market Fire: पुण्यातील टिंबर मार्केटच्या आगीने अग्निसुरक्षेचे पितळ उघडे; २०२३ च्या दुर्घटनेतूनही धडा नाही!

सोने-चांदीच्या दरातील घसरणीची प्रमुख कारणे

  • डॉलरची मजबुती : अमेरिकी डॉलर महागल्याने इतर देशांना सोने खरेदी करणे महाग पडत आहे.

  • व्याजदरांचे संकेत : अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या मागणीवर परिणाम होत आहे.

  • गुंतवणुकीचा बदलता कल : अधिक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर पर्याय निवडत आहेत.

  • नफावसुलीचा दबाव : सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर मोठे गुंतवणूकदार सोने विकून नफा मिळवत आहेत.

Gold Silver Price Crash
Maharashtra School Self Assessment: स्वयंमूल्यांकन टाळणाऱ्या राज्यातील २ हजार ३ शाळांना दणका; अनुदान बंद करण्याचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात घसरण होत असल्याने ग्राहकांकडून दरांची विचारणा वाढण्याची शक्यता आहे. मात्र, दर आणखी कमी होतील का, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे काही ग्राहक खरेदीचा निर्णय पुढे ढकलू शकतात. आगामी लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर दरातील घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक ठरू शकते.

जीत मेहता, संचालक, पुष्पम्‌ ज्वेलर्स.

सोन्याच्या दरातील घसरण प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे होत आहे. डॉलरची मजबुती, अमेरिकी व्याजदरांचे संकेत आणि गुंतवणूकदारांची नफावसुली यांचा परिणाम किमतींवर दिसतो. मात्र, सध्याची घसरण कायम राहील, असे निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना बाजारातील चढ- उतारांचा विचार करावा.

मयूर देवकर, संचालक, देवकर ज्वेलर्स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.