अभिवादनामुळे शिक्रापूर, तळेगावचा बाजार रद्द

अभिवादनामुळे शिक्रापूर, तळेगावचा बाजार रद्द

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा :  सोमवार, दि. 1 जानेवारी 2024 रोजी कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील आठवडे बाजार रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी तथा परिविक्षाधीन जिल्हा उपाधिकारी हरेश सुळ यांनी दिले. परिविक्षाधीन जिल्हा उपाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार सोमवार, रविवार, दि. 31 डिसेंबर 2023 रोजी शिक्रापूर येथील व सोमवार, दि. 1 जानेवारी 2024 रोजीचा तळेगाव ढमढेरेचा आठवडे बाजार आहे. आठवडे बाजारादिवशी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर गर्दी होत असते. तर दि. 1 जानेवारी 2024 रोजीलाच कोरेगाव भीमा येथील जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येणार आहेत.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच बसचे वाहनतळ हे शिक्रापूर बाजारतळावर असून, वक्फ बोर्ड वाहनतळाकडे जाणार्‍या व येणार्‍या बस या शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे बाजारतळावरून कासारीफाटामार्गे पाठविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही गाव परिसरातील ग्रामस्थांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन तळेगावचे सरपंच अंकिता भुजबळ व शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे यांनी केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news