Shikrapur Dolby Laser Action: शिक्रापूर पोलिसांचा डॉल्बी-लेझरला दणका; नियम मोडल्यास थेट कारवाईचा इशारा

दहीहंडी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साऊंड व लेझर चालकांची बैठक; ध्वनिप्रदूषण आणि अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधित साधनांवर बंदी
Police
PolicePudhari
Published on: 
Updated on: 

शिक्रापूर: दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिसांनी डॉल्बीच्या दणदणाटाला आणि लेझरच्या झगमगाटाला लगाम घातला आहे. नागरिकांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित साधनांचा वापर केल्यास कारवाई करण्यासाठी कोणतीही हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

Police
Pune Dahi Handi: पुण्यात आज दहीहंडीचा थरार; गोविंदांचे विक्रमी थर अन्‌ सेलिब्रिटींची उपस्थिती

आगामी दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डॉल्बी, डिजिटल साउंड सिस्टिम तसेच लेझर लाईट चालक-मालकांची बैठक घेण्यात आली. या वेळी उत्सव काळात प्लाझ्मा, प्रेशर मेड अथवा प्रेशर साऊंडचा वापर करू नये, तसेच डोळ्यांना अपायकारक ठरणाऱ्या लेझर लाईट व हायबीम शार्पी लाईटचा वापर टाळावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

Police
Pune DJ Free Dahi Handi: पुण्यात ३१ गणेश मंडळांची डीजेमुक्त दहीहंडी; लाल महाल चौकात पारंपरिक वाद्यांचा जल्लोष

उत्सवाच्या नावाखाली आवाजाची स्पर्धा रंगविण्याचा प्रकारही पोलिसांनी गांभीर्याने घेतला आहे. दोन डॉल्बी किंवा डिजिटल साउंड सिस्टिम समोरासमोर उभ्या करून मोठ्या आवाजात साऊंड कॉम्पिटिशन करू नये. त्यामुळे ध्वनिप्रदूषण वाढून ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच परिसरातील नागरिकांना त्रास होऊ शकतो. शासनाने ध्वनिप्रदूषणाबाबत वेळोवेळी जारी केलेले नियम व निर्देश पाळण्याची जबाबदारी संबंधित मंडळे आणि साऊंड चालक-मालकांची असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Police
Pune Dahi Handi Speaker Limit: पुण्यात दहीहंडीचा जल्लोष; ‘चार बास, चार टॉप’पेक्षा अधिक स्पीकर लावल्यास कारवाई

दरम्यान, लेझर लाईट आणि हायबीम शार्पी लाईटचा बेफाम वापर केल्याने वाहनचालकांच्या दृष्टीवर परिणाम होण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकाशयंत्रांचा वापर टाळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. उत्सवातील जल्लोष हा नागरिकांच्या जीविताला किंवा आरोग्याला धोका निर्माण करणारा ठरू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने आतापासूनच प्रतिबंधित साधनांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध प्रचलित कायदे व शासनाच्या निर्देशांनुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा बैठकीत देण्यात आला.

Police
Vidyanand Bapat: ‘पोरं नाही ऐकणार’ म्हणत विद्यानंद बापटांचा LED फोटो लावून DJ अन् ढोल-ताशांचा गजर, व्हिडिओ होतोय व्हायरल

दहीहंडी आणि गणेशोत्सव हे आनंद, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचे सण आहेत. त्यामुळे उत्सवाचा उत्साह कायम ठेवत कायदा व सुव्यवस्थेची मर्यादा पाळावी. उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळे, दहीहंडी मंडळे तसेच डॉल्बी, डिजिटल साउंंड आणि लेझर लाईट चालक-मालकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.

चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, शिक्रापूर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news