Pune Dahi Handi: पुण्यात आज दहीहंडीचा थरार; गोविंदांचे विक्रमी थर अन्‌ सेलिब्रिटींची उपस्थिती

ढोल-ताशांचा गजर, विद्युत रोषणाई आणि सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल; शहर-उपनगरांत उत्सवाची जय्यत तयारी
Pune Dahi Handi
Pune Dahi HandiPudhari
Published on
Updated on

पुणे: ढोल-ताशांचा गजर, सेलिब्रिटींची उपस्थिती, दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची मेहनत अन्‌ सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल... अशा वातावरणात शनिवारी (दि.५) शहर अन्‌ उपनगरांत ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव रंगणार आहेत. शहर आणि उपनगरांतील वातावरण गोविंदामय झाले असून, यंदा विक्रमी थर रचण्यासह सुरक्षिततेला प्राधान्य देत उत्सव साजरा करण्याची तयारी पथकांनी केली आहे.

Pune Dahi Handi
Pune DJ Free Dahi Handi: पुण्यात ३१ गणेश मंडळांची डीजेमुक्त दहीहंडी; लाल महाल चौकात पारंपरिक वाद्यांचा जल्लोष

मंडळांचीही तयारी पूर्ण झाली असून, उत्सवाच्या निमित्ताने शहर आणि उपनगरांत जल्लोष पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, सांगीतिक कार्यक्रम, विद्युत रोषणाई अन्‌ गीतांवर थिरकणारी तरुणाई असे वातावरण शहर आणि उपनगरांत पाहायला मिळणार आहे. पेठांमधील पारंपरिक आणि मानाच्या दहीहंडी उत्सवांसह विविध मंडळे, राजकीय पक्षांतील नेत्यांनीही उत्सवाचे आयोजन केले आहे.

Pune Dahi Handi
Pune Dahi Handi Speaker Limit: पुण्यात दहीहंडीचा जल्लोष; ‘चार बास, चार टॉप’पेक्षा अधिक स्पीकर लावल्यास कारवाई

उत्सवात सेलिब्रिटींची अन्‌ इन्फ्लुएन्सर्सची उपस्थिती

ढोल-ताशांचा गजर, गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार आणि त्यात लोकप्रिय कलाकारांची मंचावर होणारी एंट्री... यंदाच्या दहीहंडी उत्सवाची रंगत काहीशी 'सेलिब्रिटीमय' होणार आहे. उत्सवासाठी मंडळांनी मंचाची आकर्षक सजावटही केली आहे.

Pune Dahi Handi
Pune Ganeshotsav Speaker Limit: गणेशोत्सव मिरवणुकीत आठच स्पीकर; पुणे पोलिसांकडून ध्वनिप्रदूषणावर लगाम

क्रेनला लावलेली हंडी, रंगबिरंगी फुले, फुगे, विद्युत रोषणाई आणि कापडांच्या वापराने केलेली सजावट लक्षवेधी ठरत आहे. हा उत्सव पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करणार असल्याने आयोजकांकडूनही खास तयारी करण्यात आली आहे. व्यासपीठ, पथकांच्या स्वागताची व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन यावर भर दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news