

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ब क्षेत्रीय कार्यालय चिंचवड रेल्वे स्टेशनमागील क्वीन्स टाऊनशेजारी कार्यरत होते. आता कार्यालय लिंक रोड येथील एल्प्रो मॉलच्या मागील बाजूस नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत झाले आहे. नवीन इमारत एल्प्रो मॉलच्या मागील बाजूस महाकाली मंदिराजवळ उभारण्यात आली आहे. कार्यालयाचे संपूर्ण कामकाज येथून पाहिले जाणार आहे. येत्या सोमवारी (दि.24) जनसंवाद सभा त्या नवीन इमारतीमध्ये होणार आहे, अशी माहिती ब क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी दिली.
हेही वाचा