आ. शरद सोनवणे यांनी घेतली खातेप्रमुखांची झाडाझडती

सकाळी दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिली.
Narayangaon News
आ. शरद सोनवणे यांनी घेतली खातेप्रमुखांची झाडाझडतीPudhari
Published on
Updated on

नारायणगाव: जुन्नर तालुक्यातील सर्व खात्यांच्या प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शुक्रवारी (दि. 25) बोलावली होती. या बैठकीमध्ये प्रत्येक विभागाच्या अधिकार्‍यांनी आपल्या कामाचा आढावा सादर केला. सकाळी दहा वाजता सुरू झालेली बैठक सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहिली. बैठकीत आ. सोनवणे यांनी अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली. (Latest Pune News)

सामान्य जनतेची अडवणूक होणार नाही, याबाबतची दखल घ्या तसेच तालुक्यामध्ये चोर्‍या अधिक प्रमाणात वाढल्या आहेत. पोलिसांनी सतर्क राहावे, अशाही सूचना दिल्या. कृषी विभागाने शेतकर्‍यांच्या पिकांची काळजी घ्यावी शेताच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली.

Narayangaon News
Accident News: ट्रेलरच्या चाकाखाली चिरडून 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात जर कुठे गावठी दारू तयार अथवा विक्री होत असेल, तर ती तत्काळ थांबवा,अशी सूचना या वेळी दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. तालुक्यातील आरोग्य सुविधा ढिसाळ झाली असून, संबंधित अधिकार्‍यांनी योग्य प्रकारे दखल घ्यावी, अशी सूचनाही या वेळी त्यांनी बैठकीत दिली.

जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करा, असेही या वेळी त्यांनी सांगितले. कुंभमेळा जवळ आला असून, संबंधित मार्गावरचे रस्ते तातडीने दुरुस्त करून घ्या, अशी सूचना या वेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता केशव जाधव यांना केली.

Narayangaon News
Baramati Accident: डंपरच्या चाकाखाली चिरडून वडिलांसह दोन मुलींचा जागीच मृत्यू

जलसंपदा विभागाच्या कालव्याच्या अस्तरीकरणाला शासनाकडून निधी प्राप्त झाला असून, कालव्याचे अस्तरीकरण योग्य दर्जाची व्हावे, अशा सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना या वेळी दिल्या. जुन्नर तालुक्यातील अनेक मार्गांवर जुन्या एस. टी. बसगाड्या बंद पडतात व त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात.

याला कोण जबाबदार ? असा सवाल व्यक्त करून एस. टी. गाड्या रस्त्यात बंद पडणार नाही, याबाबतची खबरदारी घ्या अशी ही सूचना केली. वीजवितरणाच्या विद्युत वाहिन्या अनेक ठिकाणी खाली लोंबकळल्या आहेत. पावसाळी वातावरण असल्याने धोका होण्याची शक्यता आहे. याबाबत वीजवितरण विभागाने काळजी घ्यावी, असेही या वेळी त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना सांगितले.

या वेळी गटविकास अधिकारी प्रतीक चेन्नावार, कुलस्वामी संस्थेचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, विविध गावचे सरपंच आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news