

राहू: राहु टेळेवाडी रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरच्या चाकाखाली जाऊन एका तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना रविवारी (ता.२७) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.ओम सोमनाथ ढमढेरे असे संबंधित मुलाचे नाव आहे.ओम हा दुचाकीवर राहुच्या दिशेने दळण आणण्यासाठी चालला होता तर ट्रॅक्टर टेलर हा ऊस तोडणी कामगार घेऊन शेतात निघाला होता. (Latest Pune News)
सलग दोन ते तीन ट्रेलर ट्रॅक्टरला जोडल्यामुळे अनेकदा या परिसरामध्ये अपघात होत आहेत तर रस्त्यावरील अतिक्रमण हा देखील चिंतेचा विषय झालेला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.