Sharad Pawar : शरद पवार जुन्नरमध्ये मुक्कामी

विधानसभेच्या पार्श्वभुमीवर चर्चा रंगण्याची शक्यता
Maharashtra Politics
Sharad PawarFile photo

नारायणगाव : पुढारी वृतसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख, शरद पवार शुक्रवारी रात्री (दि.19) जुन्नर तालुक्यात मुक्कामी येत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा मुक्काम असल्याने राजकीय चर्चा रंगण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदार संघात अमोल कोल्हे दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांना जुन्नरमधून चांगले मताधिक्य मिळाल्याने जुन्नर तालुक्यातून विधानसभेसाठी महाविकास आघाडी कडून इच्छुकांची संख्या वाढली आहे.

Maharashtra Politics
Sharad Pawar Nashik Daura | शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याकडे लागले लक्ष

शरद पवार यांच्या पक्षाकडूनच अर्धा डझन इच्छुक

शरद पवार रात्री मुक्कामी असून शनिवारी (दि.19) सकाळी खा. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी निवडक कार्यकर्ते, व्यापारी आणि शेतकरी यांच्याशी ते हितगुज करणार आहेत. तसेच काही इच्छुक मंडळी पवार यांच्यासमोर आपल्या हितचिंतकांची गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Maharashtra Politics
शरद पवारांच्या उपस्थितीत शनिवारी विजय संकल्प मेळावा

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफटीफुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार माजी आमदार दिवंगत वल्लभ बेनके यांच्या निवासस्थानी जाणार नाहीत. अन्यथा दरवेळी जुन्नरच्या दौऱ्यावर असले की, ते बेनके यांच्या निवासस्थानी पहिले येत असत. या बाबत आ. अतुल बेनके यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, तालुक्याला विकास निधी मिळावा म्हणून मी अजित पवार यांच्या सोबत जरी गेलो तरी शरद पवार आमचे दैवत आहे. तालुक्याचा आमदार म्हणून मी त्यांचे स्वागत करणार आणि घरी येण्याचा आग्रहही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news