Sharad Pawar Nashik Daura | शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याकडे लागले लक्ष

विधानसभेचे रणशिंग फुंकणार?
sharad pawar
शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्याकडे लागले लक्षPudhari File Photo
Published on
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शुक्रवारी (दि. १९) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत निफाडला शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दौऱ्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकांबाबत खा. पवार काही महत्वपूर्ण घोषणा करता याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

निफाडच्या सहकार क्षेत्रातील नेते स्व. मालोजीराव मोगल यांची जयंती व स्मृतीदिन एकाच दिवशी आहे. यानिमित्ताने चितेगाव फाटा येथे दुपारी साडेचार वाजता शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार हे मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणूकीत दिंडोरीतील मतदारांनी पवार यांना साथ दिली. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी पवार यांच्या दौऱ्याला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे. शेतकरी मेळाव्याप्रसंगी स्व. मोगल यांच्यासोबत कार्य करणारे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी, आजी-माजी आमदार उपस्थित राहतील, अशी माहिती राजेंद्र मोगल यांनी दिली. मेळाव्याच्यानिमित्ताने जिल्हा बॅंक कर्जवसूली, कांद्याचा प्रश्न, निफाड सहकारी साखर कारखान्याच्या समस्यांबाबत शेतकरी हे पवार यांची भेट घेणार असल्याचे माेगल यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणूकीनंतर प्रथमच पवार हे नाशिकमध्ये येत असल्याने पक्षाकडून विशेष तयारी केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news