Football Tournament Pune: आयएफा, जीओजी, केपी इलेव्हन दुसऱ्या फेरीत

‘सेवा, कर्तव्य, त्याग’ फुटबॉल स्पर्धेत दमदार विजयांसह संघांची आगेकूच
सेवा, कर्तव्य, त्याग‌' फुटबॉल स्पर्धेतील जीओजी एफसी संघाचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.
सेवा, कर्तव्य, त्याग‌' फुटबॉल स्पर्धेतील जीओजी एफसी संघाचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.Pudhari
Published on
Updated on

पुणे : ‌'सेवा, कर्तव्य, त्याग‌' फुटबॉल स्पर्धेत आयएफा स्काय हॉक्स्‌‍, जीओजी एफसी, केपी इलेव्हन, युनिक वानवडी आणि एफसी शिवनेरी संघांनी प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

सेवा, कर्तव्य, त्याग‌' फुटबॉल स्पर्धेतील जीओजी एफसी संघाचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.
Mangalwar Peth Burglary: मंगळवार पेठेत तीन लाखांची घरफोडी

या स्पर्धेत रियान यादगिरी आणि अबु बाबर यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर आयएफा स्काय हॉक्स्‌‍ संघाने ब्ल्यु स्टॅग सॉकर ॲकॅडमीचा २-० असा सहज पराभव केला. सतिश हवालदार याने हॅट्रीकसह नोंदविलेल्या सलग चार गोलांच्या जोरावर जीओजी एफसी संघाने घोरपडी यंग वन्स्‌‍ संघाचा ५-० असा धुव्वा उडविला. प्रेम कुमार बी. यानेसुद्धा गोल नोंदवून संघाची आघाडी फुगवली. मेल्विन फेरा आणि अल्‌‍फ्रेड नेगल यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर केपी इलेव्हन संघाने परशुरामियन्स्‌‍ संघाचा २-० असा पराभव करून आगेकूच केली.

सेवा, कर्तव्य, त्याग‌' फुटबॉल स्पर्धेतील जीओजी एफसी संघाचा खेळाडू चेंडूवर ताबा मिळविताना.
Karna Marathi Play: नटराजच्या ‘कर्ण’ नाटकाचे दिल्लीत दोन विशेष प्रयोग

विवियन एस. याने केलेल्या गोलाच्या जोरावर युनिक वानवडी संघाने हायलँडर्स एफसी संघाचा १-० असा पराभव केला. चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात एफसी शिवनेरी सांने इन्फान्ट एफसी संघाचा ४-३ असा पराभव केला. पूर्णवेळ गोलशुन्य बरोबरी राहील्याने सामन्यात टायब्रेकमध्ये पध्दतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये इन्फान्ट एफसीकडून डोनाल्ड टी., अमोल वाघमारे आणि प्रथमेश भोसले यांनी तर, एफसी शिवनेरी संघाकडून शबीर शेख, राजेश पवार, हर्ष परदेशी आणि झीशान शेख यांनी गोल नोंदवून संघाला विजय मिळवून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news