

पुणे : मंगळवार पेठेत बंद फ्लॅट फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. सोबतच दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दोन घरांतून ऐवज लांबवला आहे.
त्यामुळे घरफोडणारे आता बंद घरांसोबतच उघडे घर टार्गेट करत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात २७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १ डिसेंबर रोजी ही घटना घडली असून, याप्रकरणात आता पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे नवीन मंगळवार पेठेतील लडकत पेट्रोल पंपाजवळील एका सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्यांचा फ्लॅट तळमजल्यावरच आहे. दरम्यान, ते घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात असलेले २ लाख ९९ हजार २३१ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अधिक तपास सहायक निरीक्षक गजानन जाधव करत आहेत.