

विषाणू आणि मानवाची लढाई सतत सुरू असते. विषाणूही आपली हत्यारे म्युटेशनच्या स्वरूपात तयार करत असतो. विषाणूमधील जनुकीय संरचनेतील बदलाचा अभ्यास जिनोम सीक्वेनसिंगमध्ये केला जातो. सीक्वेन्सिंग हे तंत्रज्ञान, तर सर्व्हेलन्स म्हणजे तंत्रज्ञानाचे सर्वेक्षण असते. विषाणूच्या विविध व्हेरिएंटचे जिनोम सीक्वेन्सिंग झाल्यास आजार रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे शक्य होऊ शकते.– डॉ. राजेश कार्यकर्ते, मायक्रोलॉजी विभागप्रमुख, ससून रुग्णालय.