सीईटी अर्जांसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ; 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार

सीईटी अर्जांसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ; 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहेत. या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, वास्तुकला, विधी, डिझाइन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

सीईटींच्या नोंदणीसाठी 16 ते 30 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, काही विद्यार्थ्यांना अर्ज भरता न आल्याने 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत झालेल्या नोंदणीत अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, अनेक पालक, विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी करण्यात आल्याने सीईटी सेलकडून मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एकूण  12 प्रवेश परीक्षांना अर्ज करण्यासाठीची मुदत 12 फेब—ुवारीपर्यंत वाढवण्यात आली. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले. परीक्षांबाबतची अधिक माहिती www.mahacet.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news