पिंपरी(पुणे) : चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी सायन्स सिटी उभारण्यात येणार होते. मात्र, पिंपरी-चिंचवड व पुणे शहरात 30 ते 35 एकर जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मुंढवा येथील जागेचा पर्याय समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यातइतकी जागा उपलब्ध झाल्यास तेथे सायन्स सिटी बांधली जाईल, असे अजित पवार यांनी आरोपाचे खंडन केले. यासंदर्भात 'पुढारी'ने वृत्त सोमवारी (दि.21) प्रसिद्ध केले होते. त्यावरून शहरातील भाजप व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्याबाबत पवारांनी वरील खुलासा केला.
ते म्हणाले की, राज्य सरकार सायन्स सिटी बांधणार आहे. त्यासाठी प्रथम चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारचा पर्याय समोर आला. मात्र, तेथे पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने पुणे शहरातील मुंढव्याची जागेचा पर्याय समोर आला आहे. सायन्स सिटीला राज्यभरातून विद्यार्थी भेट देतात. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पुरेशी जागा उपलब्ध झाल्यास तेथे सिटी बांधली जाईल. त्यासाठी केंद्र सरकार तब्बल 60 टक्के निधी देणार आहे. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार हा प्रकल्प उभारला जाणार आहे, असे सांगत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा