Maharashtra School Timetable Change: शाळांच्या वेळापत्रकात मोठा बदल; विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय तासिका सुरू

नवीन शैक्षणिक वर्षापासून वाचनसंस्कृतीला चालना; एससीईआरटीने जाहीर केले नवे वेळापत्रक
Library
LibraryPudhari
Published on
Updated on

पुणे: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून शाळेच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. ग्रंथालय ही नवी तासिका समाविष्ट करण्यात आली असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठीचे उपक्रम करणे शक्य होणार आहे. नव्या वेळापत्रकामध्ये काही नव्या तासिकांची भर पडली असून, पूर्वीच्या तुलनेत काही विषयांच्या तासिका कमी झाल्या आहेत.

Library
Maharashtra Teacher Training Schedule: शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर; १० जुलैपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण पूर्ण होणार

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार यंदा राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू केली जाणार आहेत. त्यामुळे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी शाळांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार शाळांना शैक्षणिक कामकाजाचे नियोजन करावे लागणार आहे.

Library
Morgaon Somvati Amavasya: मोरगावात सोमवती अमावास्येनिमित्त श्री मयूरेश्वरांचा पारंपरिक ऊर्ध्ववचन सोहळा

विषयनिहाय तासिका विभागणी, शालेय वेळापत्रकाबाबतच्या सूचना इयत्ता तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७पासून अंमलात असून, पाचवी, सातवी, आठवी या इयत्तांसाठी नवीन पाठ्यपुस्तके लागू झाल्यावर या सूचना लागू होणार आहेत. या वेळापत्रकानुसार २३७ दिवस शालेय कामकाजाचे, तर १२८ दिवस सुट्यांचे असणार आहेत. तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी या इयत्तांसाठीचे वेळापत्रक देण्यात आले आहे.

Library
Illegal Teak Wood Seizure: मंचरमध्ये ४८ सागवृक्षांचा बेकायदा साठा; वन विभागाची मोठी कारवाई

तिसरी ते पाचवीसाठी मराठी, इंग्रजी, गणित, आपल्या सभोवतालचे विज्ञान १, आपल्या सभोवतालचे विज्ञान २, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरामयता, कार्यशिक्षण, तर सहावी ते आठवीसाठी मराठी, इंग्रजी, प्रचलित तिसरी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरामयता, कार्यशिक्षण हे विषय असणार आहेत, तर स्काऊट-गाइड ऐच्छिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Library
Baramati Gutkha Smuggling: बारामतीत गुटखा विक्रीचे छुपे जाळे; कोडवर्डपासून होम डिलिव्हरीपर्यंत नवे फंडे

'आनंददायी शनिवार'बाबत प्रश्नचिन्ह

नव्या वेळापत्रकानुसार दप्तरविना शाळा, आनंददायी शनिवार उपक्रम कसे राबवायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तिसरी ते पाचवीच्या वेळापत्रकात कार्यशिक्षण, शारीरिक शिक्षण अशा तासिका, तर सहावी ते आठवीच्या वेळापत्रकात शनिवारच्या वेळापत्रकात विषयांच्या तासिका देण्यात आल्या आहेत. स्काऊट-गाइड, आनंददायी शनिवार असे उपक्रम शाळेच्या वेळेव्यतिरिक्त घेता येतील, असे 'एससीईआरटी'ने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news