Illegal Teak Wood Seizure: मंचरमध्ये ४८ सागवृक्षांचा बेकायदा साठा; वन विभागाची मोठी कारवाई

कोलतावडे वृक्षतोड प्रकरणात विनापरवाना वाहतूक उघड; गजानन आरागिरणी सील करून वन विभागाचा कठोर इशारा
Wood
WoodPudhari
Published on
Updated on

मंचर: कोलतावडे (ता. आंबेगाव) येथील वृक्षतोडीप्रकरणी विनापरवाना वाहतूक करण्यात आलेल्या ४८ सागवृक्षांचा साठा मंचर (ता. आंबेगाव) येथील गजानन आरागिरणीच्या आवारात आढळला. त्यामुळे वन विभागाने संबंधित आरागिरणी शुक्रवारी (दि. १२) सील केली.

Wood
Baramati Gutkha Smuggling: बारामतीत गुटखा विक्रीचे छुपे जाळे; कोडवर्डपासून होम डिलिव्हरीपर्यंत नवे फंडे

वन विभागाकडून करण्यात आलेल्या तपासात कोलतावडे परिसरातील वृक्षतोडीनंतर ४८ सागवृक्षांची विनापरवाना वाहतूक करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या वृक्षांचा साठा मंचर येथील गजानन आरागिरणीच्या आवारात करण्यात आल्याचेही तपासात पुढे आले.

Wood
Baramati School Shopping: बारामतीत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी; वाढत्या दरांनी पालकांची चिंता वाढली

याप्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची दखल घेत उपवनसंरक्षक जुन्नर यांनी संबंधित आरागिरणी तत्काळ बंद करण्याचे आदेश मंचर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून सदर आरागिरणी बंद केली. वनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी विनापरवाना वृक्षतोड, वाहतूक व साठा करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वन विभागाने दिला आहे.

वन विभागाची पूर्वपरवानगी न घेता साग वृक्षांची वाहतूक अथवा साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. वनसंपत्तीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी वनविषयक नियमांचे पालन करावे.

विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news