BBA-BCA Scholarships
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांना द्यावी लागणार शिष्यवृत्तीFile Photo

BBA-BCA Scholarships| बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांना द्यावी लागणार शिष्यवृत्ती

या अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बीबीए, बीसीए अभ्यासक्रम आपल्या कार्यक्षेत्रात घेतल्यामुळे या अभ्यासक्रमांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीप्रमाणेच या अभ्यासक्रमांना राज्य सरकारला शिष्यवृत्ती द्यावी लागेल, अशी माहिती एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीतारामन यांनी बुधवारी (दि.३) दिली.

BBA-BCA Scholarships
आमदार निवासात लिफ्ट अडकली; लिफ्टमनला अॅटॅक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभासाठी डॉ. सीतारामन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. सीतारामन म्हणाले, देशभरातील जवळपास सहा हजारांपेक्षा अधिक बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनी मान्यता घेतली आहे.

BBA-BCA Scholarships
Weather Forecast Today | घाटमाथा क्षेत्रात पावसाचा जोर वाढणार

एआयसीटीईने हे अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेतले, याबाबतचा विरोध आता मावळत आहे. देशातील काही शिक्षण संस्था या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात गेल्या आहेत. मात्र, न्यायालय एआयसीटीईच्या बाजूने निकाल देईल, अशी शक्यता वाटते. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एआयसीटीईकडून स्वतंत्र शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

BBA-BCA Scholarships
Crop Insurance| नावात थोडासा बदल असेल तरी पीक विमा अर्ज स्वीकारणार

याच धर्तीवर राज्य सरकारकडूनही अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल. याबाबत काही दिवसांपूर्वी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांशी बैठक झाली होती, त्या बैठकीत शिष्यवृत्ती देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आल्याचे डॉ. सीतारामन यांनी सांगितले.

logo
Pudhari News
pudhari.news