MHT CET 2027 Exam Dates: MHT CET 2027 च्या तारखांबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई; यूट्यूब चॅनेलला कायदेशीर नोटीस

सीईटी कक्षाचा सोशल मीडियावर वॉच; परीक्षा केंद्र बदलून देणे आणि पर्सेंटाइल वाढवून देण्याच्या दाव्यांबाबत तक्रारी करण्याचे आवाहन
Fake CET Exam Information
Fake CET Exam InformationPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: सीईटी कक्षाच्या प्रवेश परीक्षा, वेळापत्रक, परीक्षेचे निकाल व केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियाबाबत अनेकदा दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती, दावे प्रसिद्ध केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. तसेच, सीईटी कक्षाच्या प्रतिमेस बाधा होत असते. यावर सीईटी कक्ष देखरेख ठेवून चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या ''एक्स, फेसबुक, यूट्यूब व व्हॉट्सॲप'' या सोशल मीडियातील अकाऊंटकर्त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे.

Fake CET Exam Information
Pune FDA Paneer Khoya Seizure: पुण्यात ३१ लाखांचा भेसळीचा संशय असलेला पनीर-खवा जप्त करून नष्ट; एफडीएची मोठी कारवाई

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.

Fake CET Exam Information
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2027: सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा जानेवारीत; १३ ते १७ जानेवारी २०२७ दरम्यान फर्ग्युसन मैदानावर रंगणार

विद्यार्थी व पालक यांनाही आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर सीईटीच्या संबंधित काही चुकीची माहिती, पोस्ट, रील, पॉडकास्ट, व्हिडीओ व आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास, तसेच परीक्षा केंद्रे बदलून देण्याचा दावा करणे, पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा दावा करणे अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील तक्रारी असतील, तर socialmedia.complaints@mahacet.org याच ईमेलवर पाठवून द्याव्यात. या तक्रारीची सीईटी कक्ष सत्यता पडताळून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Fake CET Exam Information
Pune PMPML New Buses: पुणेकरांसाठी वर्षभरात २,५०० नव्या पीएमपी बस; डेपोंच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे आयुक्तांचे आदेश

एका यूट्यूबरला नोटीस

डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर शिवा नामक यूट्यूबरने एमएचटी सीईटी २०२७ च्या दोन्ही परीक्षांच्या तारखा, त्यांच्या अर्ज नोंदणी करण्याच्या तारखा, निकालाच्या तारखा पॉडकास्ट करून जाहीर केल्या. यामुळे विद्यार्थी व पालकांत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या.

Fake CET Exam Information
Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी महायुतीचे सांघिक प्रयत्न; दत्तात्रय भरणे यांची ग्वाही

अजून सीईटी कक्षाने २०२७ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. यामुळे डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलला एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. सदरचा व्हिडीओ यूट्यूबवरून तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर याचे स्पष्टीकरण प्रसारित करण्यात यावे व याबाबतचे लेखी स्पष्टीकरण पुराव्यासह सीईटी कक्षाकडे सादर करण्याचे निर्देश या कायदेशीर नोटिशीमध्ये देण्यात आले आहेत. तसेच, या कायदेशीर नोटिशीची प्रत गुगल इंडियाच्या दिल्ली व मुंबईच्या कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news