Satkarsthal Road Potholes: एक खड्डा बुजवला अन्‌ बाकीचे तसेचच! ग्रामस्थांचा संताप शिगेला

सातकरस्थळमधील खड्ड्यांमुळे अपघात; ग्रामस्थ करणार पुन्हा आंदोलन
Satkarsthal road potholes
एक खड्डा बुजवला अन्‌ बाकीचे तसेचच!Pudhari
Published on
Updated on

खेड : राजगुरुनगर ते भीमाशंकर मार्गावरील सातकरस्थळ येथे वाडा रस्त्यावर खड्ड्यांच्या समस्येमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी रविवारी (दि. 21) या रस्त्यावरील खड्ड्यात टेबल टाकून चहापान सुरू करीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध नोंदविला. दै. ‌‘पुढारी‌’मध्ये सोमवारी (दि. 22) वृत्त प्रसिद्ध होताच फोटोत असलेला खड्डा राडारोडा टाकून बुजविला; मात्र मागे-पुढे खड्ड्यांची मालिका आहे. येथे अपघात होत आहेत. (Latest Pune News)

त्याचे काय? असा प्रश्न उपस्थित करून सातकरस्थळच्या सरपंच ऋतिका सातकर, माजी सरपंच अजय चव्हाण व सहकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 23) सार्वजनिक बांधकाम कार्यालयात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देणार असल्याचे सांगितले.

वाडा रस्ता राजगुरुनगर ते भीमाशंकर मार्गाचा भाग असून, पश्चिम भागातील 50 हून अधिक गावे आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरला जाणारी वाहने याच मार्गाचा वापर करतात. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि आमदार बाबाजी काळे यांच्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, राजगुरुनगर आणि सातकरस्थळ परिसरात त्यांची संख्या आणि खोली अधिक आहे.

Satkarsthal road potholes
Maharashtra Olympic Association: सर्वच क्रीडा संघटनांना मतदानाचा हक्क द्या; एमओए विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांना सामोरे जावे लागणाऱ्या नागरिकांनी अखेर संताप व्यक्त करीत थेट खड्ड्यात टेबल टाकून चहापान सुरू केले.

या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, अजय चव्हाण, आकाश सातकर, अभिजित सातकर, साहेबराव सातकर, विकास थिगळे, पांडुरंग आरुडे, योगेश कोहिनकर, सुनील बलदोटा, बाबासाहेब कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले. दै.

Satkarsthal road potholes
Sarpanch Action Proposal: वालचंदनगर सरपंचावर कारवाईचा प्रस्ताव; कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

‘पुढारी‌’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर या रस्त्यावरील एक खड्डा बुजविला; मात्र बाकीच्या खड्ड्यांची अवस्था अपघाताला निमंत्रण देत आहे. यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले असून, तात्पुरती कामे नको तर टिकाऊ डांबरीकरण काम दोन दिवसांत काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर तीव आंदोलन करणार आहोत, असे अजय चव्हाण यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news