Satara Pune Demo Train: पुण्याकडे जाणारी डेमो रेल्वे घाटातच बंद; साडेतीन तासांच्या विलंबाने प्रवाशांचा संताप

शिंदवणे घाट उतरल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड; दुसरे इंजिन आणून गाडी पुण्यात दाखल, विद्यार्थ्यांसह नोकरदारांची मोठी गैरसोय
Satara Pune Demo Train
Satara Pune Demo TrainPudhari
Published on
Updated on

निरा: सातारा-पुणे डेमो रेल्वेचे इंजिन शिंदवणे घाट उतरल्यानंतर अचानक बंद पडल्याने प्रवाशांना सोमवारी (दि.१०) प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी सकाळी निरा येथून पुण्याकडे निघालेली डेमो शिंदवणे घाट उतरल्यानंतर आळंदी रेल्वेस्थानकाच्या पुढे अचानक बंद पडली.

Satara Pune Demo Train
Sugar Industry Business Model: साखर उद्योगासाठी सुवर्णसंधी; ‘प्युअर बिझनेस मॉडेल’ स्वीकारल्यास शेतकऱ्यांना मिळणार अधिक दर

तब्बल साडेतीन तासांच्या विलंबानंतर ही गाडी पुणे स्थानकात पोहोचली. गेल्या दोन वर्षांपासून या डेमोच्या इंजिनमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. नीरा रेल्वेस्थानकातून पुण्याकडे जाणारी ही डेमो साधारण सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे स्थानकात पोहोचणे अपेक्षित असते.

Satara Pune Demo Train
Khadakwasla Dam: खडकवासला धरणातून पुन्हा मुठा नदीत विसर्ग; चारही धरणे १०० टक्के भरली

सातारा, लोणंद, निरा, वाल्हे, दौंडज, जेजुरी परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, व्यापारी तसेच पुण्यातून पुढे प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. मोठ्या संख्येने पासधारक प्रवासी या गाडीने दररोज प्रवास करतात.

Satara Pune Demo Train
PMPML Double Decker Bus: पुणेकरांसाठी डबल डेकर बसची सफर; पीएमपीच्या ताफ्यात येणार २५ नव्या बस

सोमवारी डेमो आळंदीच्या पुढे बंद पडल्यानंतर गाडीचे मागील इंजिन सुरू करून ती पुन्हा आळंदी स्थानकात आणण्यात आली. त्यानंतर पुणे येथून दुसरे इंजिन आणून डेमोला जोडण्यात आले. अखेर दुपारी सुमारे दीड वाजता ही गाडी पुणे रेल्वेस्थानकात पोहोचली. रेल्वे बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. परिसरात एसटी अथवा अन्य वाहनांची सुविधा सहज उपलब्ध नसल्याने प्रवासी मेटाकुटीला आले होते.

Satara Pune Demo Train
Maharashtra Rainfall: राज्यात पावसाचे असमान वितरण; १९० तालुके सरासरीच्या खाली

गाडीत रुग्ण अडकल्याने त्यांनाही त्च्यारास झाला. नोकरदारांची कामावर जाण्याची वेळ चुकली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचता आले नाही. याबाबतचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. वारंवार बिघाड होणारे इंजिन पुणे-मिरज मार्गावर पुन्हा चालवू नये. प्रवाशांशी खेळ सुरू ठेवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news