Maharashtra Illegal Moneylending: पुरंदर तालुक्यात खासगी सावकारीचा सुळसुळाट; नागरिक आर्थिक संकटात

सासवड आणि पुरंदर तालुक्यात अवाजवी व्याजदराने खासगी सावकारांचे जाळे वाढले;मालमत्ता बळकावण्याच्या घटना वाढल्या असून प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले
Illegal Moneylending
Illegal MoneylendingPudhari
Published on
Updated on

सासवड: पुरंदर तालुक्यात गावोगावी खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढत असून, आर्थिक मंदीच्या काळातही या सावकारी व्यवसायाला ‌’अच्छे दिन‌’ आले असल्याचे चित्र आहे. अवाजवी व्याजदरांच्या विळख्यात अडकलेल्या गोरगरिबांचे संसार उद्ध्‌‍वस्त होत असून, अनेक कुटुंबे आर्थिक व मानसिक संकटात सापडली आहेत.

Illegal Moneylending
Maharashtra Onion Farming Crisis: मंचरमध्ये कांदा उत्पादकांना दुहेरी झटका

तालुक्यातील सासवडसह ग््राामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत खासगी सावकारांचे जाळे घट्ट विणले गेले आहे. दहा ते तीस टक्क्यांपर्यंतच्या प्रचंड व्याजदराने पैसे देण्याची पद्धत रूढ झाली आहे. कर्ज देताना कोरे धनादेश, घरांची कागदपत्रे किंवा शेती स्टॅम्पवर लिहून घेण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. मात्र, वाढत्या व्याजाच्या ओझ्यामुळे मूळ रक्कम फेडणे अशक्य ठरत असून, कालांतराने कर्जदारांची मालमत्ता बळकावण्याचे प्रकार घडत आहेत.

Illegal Moneylending
Pune Sassoon Hospital: ससून रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये मोठी घट

गेल्या दहा ते पंधरा वर्षांत तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाले. त्यात बोगस व्यवहारांचे प्रमाणही वाढले असून, काही जण या माध्यमातून कोट्यधीश झाले आहेत. याच पैशांतून अनेकांनी सावकारीचा गोरखधंदा सुरू केल्याची चर्चा आहे. दहशतीच्या वातावरणात कर्जदारांना गप्प बसवले जात असून, काहींनी गाव सोडून पलायन केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, काही गंभीर प्रकरणे उघडकीसही आली नसल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.

Illegal Moneylending
Pune Ragging Case: पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग प्रकरण; 5 विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

सावकारांवर कठोर कारवाई करणार: आ. शिवतारे

खासगी सावकारीने पुरंदर तालुक्यात थैमान घातले आहे. आमदार झाल्यापासून या प्रकारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. व्याजाचा बेकायदेशीर व्यवसाय करणारे कोणीही असले, तरी ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. अशा सावकारांविरोधात तक्रारी दाखल केल्यास संबंधितांचे पैसे माफ करून पिळवणूक थांबवली जाईल. बाधितांनी सासवड व जेजुरी पोलीस ठाण्यात किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार विजय शिवतारे यांनी केले.

Illegal Moneylending
Uruli Devachi Fursungi Water Issue: उरुळी देवाची-फुरसुंगीला पाणीटंचाई; 180 टँकर आणि 40 कोटींची मागणी

भीती न बाळगता माहिती द्या: पोलिस निरीक्षक कुमार कदम

सासवड शहर व ग््राामीण भागात बेकायदेशीर सावकारी आणि जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता संबंधितांची नावे व माहिती पोलिसांना द्यावी. फिर्यादींना कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news