

पुणे: दै. ‘पुढारी’ ने अनेक निकष विचारात घेऊन निवड केलेल्या पुणे जिल्ह्यातील अतिशय कार्यक्षम, नि:स्पृह समाजसेवा करणार्या सरपंचांचा सत्कार आणि पुरस्कार वितरण उद्या बुधवारी (दि.7) पुण्यात एका शानदार समारंभामध्ये होणार आहे. पुण्यातील पंचतारांकित लेमन ट्री या हॉटेलच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक कल्याण, औकाफमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज डेअरीचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल ढमढेरे उपस्थित राहणार आहेत. (Latest Pune News)
पुणे जिल्ह्यात अनेक सरपंचांनी ग्रामविकासाचे काम अतिशय धडाक्यात आणि जोरदारपणे केलेले आहे, यातील काही निवडक सरपंचांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल सामाजिक कृतज्ञता व्यक्त करावी, या हेतूने दै. ‘पुढारी’ने हा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या समारंभासाठी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज डेअरीचे ‘डेअरी पार्टनर’ म्हणून प्रायोजकत्व लाभले आहे.
या सत्कार सोहळ्यात या सर्व सरपंचांना ‘सरपंच सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. खेडी सुधारली तरच गरिबी निर्मूलन होऊन देशाचा विकास होईल, या महात्मा गांधींच्या विचारांवर श्रद्धा ठेवून दै. ‘पुढारी’चे संस्थापक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी नेहमीच ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देत दै. ‘पुढारी’ च्या व्यासपीठावरून तेथील प्रश्नांना वाचा फोडून ते धसास लावले आहेत, हीच परंपरा पुढे त्यांच्या पुढच्या पिढीने विद्यमान मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव आणि समूह संपादक, दै. ‘पुढारी’ वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी समर्थपणे चालवली आहे.
या सर्वांच्या प्रेरणेतूनच ग्रामीण विकासाचे ध्येय गाठण्यासाठी दै. ‘पुढारी’ सर्वतोपरी सर्व घटकांना मदत करण्याच्या भूमिकेमध्ये नेहमीच राहिलेला आहे. अनेक सरपंच आपल्या गावाच्या विकासासाठी झटत आहेत, या सर्व सरपंचांना प्रोत्साहन या पुरस्कारामुळे मिळणार आहे. या पुरस्कारातून अशा प्रकारे ग्रामविकासाचे काम करणार्या सर्वांना प्रेरणा मिळावी, हा सुध्दा या पुरस्कार प्रदानाचा हेतू आहे.
दै. ‘पुढारी’ ने नेहमीच ग्रामविकासाला महत्त्व आणि पाठबळ दिलेले आहे. ग्रामविकासातील अनेक चांगल्या कामांचे कौतुक आणि अडथळ्यांवर लेखणीच्या माध्यमातून आसूड ओढून या अडचणी सोडविण्यासाठी दै. ‘पुढारी’ने नेहमीच महत्त्वाची भूमिका घेतली आहे, ग्रामविकासाशी दै. ‘पुढारी’ची नाळ घट्ट जोडलेली आहे, त्याच भावनेतून हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. या पुरस्कार सोहळ्यात खालील मान्यवर सरपंचांचा सत्कार करण्यात येणार आहे.
इंदापूर तालुक्यातील सरपंच: सौ. अश्विनी नानासाहेब बंडगर (मदनवाडी), श्री. कालिदास हरिश्चंद्र देवकर (लोणी देवकर), श्री. चांगदेव भागवत ढुके (अगोती नं. 2), श्री. प्रवीण दशरथ डोंगरे (निमगाव केतकी), श्री. मेघराज अंबादास कुचेकर (पळसदेव), श्री. पार्थ दत्तात्रय निंबाळकर (सणसर), श्री. किरण विलासराव पाटील (बावडा), श्री. प्रतापराव सर्जेराव पाटील (निरनिमगाव), सौ. इंदुबाई रामहरी वाघमोडे (गोंदी-ओझर).
बारामती: श्री. गणेश चंद्रकांत शिंदे (साबळेवाडी).
दौंड: श्री. ज्ञानेश्वर तुकाराम चौधरी (खोर), श्री. संतोष मधुकर दोरगे (भांडगाव), सौ. रागिणी गणेश जगताप (लडकतवाडी), श्री. श्याम यशवंत कापरे (कर्तव्य फाउंडेशन), सौ. निलमताई नरेंद्र काटे (देलवडी), श्री. भरत मधुकर खोमणे (जिरेगाव), श्री. दादासाहेब आनंदा कोळपे (दहिटणे), श्री. सागर रघुनाथ शेलार (मिरवडी), सौ. छाया मोहन शितोळे (कुसेगाव).
भोर: सौ. हेमलताताई मिलिंद खोपडे (आंबाडे), श्री. संदीप बबनराव नलावडे (निगडे मोसे), सौ. अंजली अनिल ननावरे (कुरुंगवडी).
मुळशी: सौ. निकिता चंद्रशेखर रानवडे (नांदे), श्री. अजय विजय कडू (पौड), श्री. नामदेव तुकाराम माझिरे (भुकूम).
पुरंदर: श्री. भारत शांताराम मोरे (सोनोरी), श्री. ज्ञानदेव कोंडिबा वचकल (वीर).
हवेली: श्रीमती. नंदाताई लालदास जोरी (मालखेड), श्री. अमोल रामदास कोंडे (खेड शिवापूर), श्री. सचिन चंदरराव पायगुडे (मांडवी बुद्रुक), श्री. सागर भाऊराव सणस (युवा उद्योजक).
शिरूर: सौ. अंकिता भरत भुजबळ (तळेगाव ढमढेरे), श्री. विक्रम पोपटराव दरेकर (दरेकरवाडी), श्री. विक्रम कचरूदास गव्हाणे (कोरेगाव भीमा), श्री. दामूशेठ धोंडिबा घोडे (टाकळी हाजी), सौ. रेखा मल्हारी काळे (सोने सांगवी), सौ. धनश्री संतोष मोरे (तर्डोबाचीवाडी), सौ. अश्विनीताई रामभाऊ गायकवाड (निमगाव दुडे).
खेड: सौ. मंगलताई राजेंद्र भोसले (श्री क्षेत्र महाळुंगे इंगळे), सौ. सोनल अविनाश बोत्रे (खालुंब्रे), सौ. साधनाताई प्रकाश चौधरी (सिद्धेगव्हाण).
जुन्नर: श्री. अमोल चंद्रकांत भुजबळ (येणेरे).
आंबेगाव: श्री. उत्तमराव बंडू टाव्हरे (टाव्हरेवाडी).
सोहळा फक्त निमंत्रितांसाठी
हा सरपंच सन्मान सोहळा फक्त निमंत्रितांसाठीच आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, ही विनंती.