पिंपरी : सॅनिटरी पॅड मशीन नावालाच ! मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी : सॅनिटरी पॅड मशीन नावालाच ! मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जंतूसंसर्ग टाळून मुलींमध्ये सॅनिटरी पॅडचा वापर व्हावा, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अठरा माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मशीन लावण्यात आल्या आहेत. मात्र, यातील अकरा मशीन बंद आहेत. त्यामुळे सॅनिटरी पॅड वापरण्याच्या जनजागृतीचा उद्देश फोल ठरला आहे. तसेच, इतर कार्यालयातील स्वच्छतागृहांमध्ये महिलांसाठी लावण्यात आलेले मशीन नावालाच आहेत. शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना सॅनिटरी नॅपकीनचा खर्च परवडत नाही. आरोग्याच्यादृष्टीने सुलभ असे सॅनटरी नॅपकिन वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी पॅड मशिन बसविण्यात आले आहेत. या मशिनमुळे विद्यार्थिनींना त्या कठीण दिवसांत मोठा आधार मिळत आहे.

शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थिनींना पाळीमुळे आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी महापालिका, काही सामाजिक संस्था किंवा बचत गटाकडून स्वस्त दरामध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले जातात. या मशिन्सव्दारे आता शाळेच्या वेळेत विद्यार्थिंनीना केव्हाही सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध होत आहेत.

महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात कपड्यापासून होणारा जंतुसंसर्ग आणि आजार यांचे उच्चाटन होण्यासाठी सॅनिटरी पॅडचा वापर व्हावा, यासाठी सर्वस्तरातून जनजागृती केली जात आहे. महापालिका शाळेत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिकत आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींना सॅनिटरी पॅड वापरणे शक्य नाही. तसेच, कपडा बदलण्याच्या कारणामुळे बर्‍याच विद्यार्थिनी त्या दिवसांत शाळेला येत नाहीत. ग्रामीण भागात, तर या कारणामुळे आजही अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते.

मनपाकडून मुलींसाठी शाळेच्या स्वच्छतागृहात या मशीन लावण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळापूर्वी अठरामधील नऊ शाळांमध्ये मशीन बंद होत्या. त्या कालावधीत ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे मशीन्स दुरुस्ती झालीच नाही. सध्या ऑफलाइन शाळा सुरू असल्याने अकरा शाळांनी मशिन्सची दुरुस्तीची मागणी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news