बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री; टोळी जेरबंद : स्वारगेट पोलिसांची कारवाई

बनावट कागदपत्रांद्वारे गाड्यांची विक्री; टोळी जेरबंद : स्वारगेट पोलिसांची कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बनावट कागदपत्रांद्वारे चारचाकी गाड्यांची विक्री करणार्‍या टोळीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून 36 लाख रुपये किमतीची सहा चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. आयुष अभय कुलथे (वय 25, रा. रहाटणी पिंपरी), सुजित भाईदास बडगुजर (वय 26, रा. झील चौकाजवळ नर्‍हेगाव), प्रथमेश संतोष शेटे (वय 22, रा. गुरुद्वारा चौकाजवळ आकुर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. तिघा आरोपींनी इतर साथीदारांसोबत मिळून लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
गणेश जगदाळे (वय 28, रा. परांडा, जि. धाराशिव) यांची 25 मार्च रोजी स्वारगेट बसस्थानक परिसरात आयुष कुलथे याच्याशी भेट झाली. या वेळी त्याचे नाव नवनाथ खजिने असे असल्याचे त्याने खोटे सांगितले.

तसेच त्याच्या नावाने गाडीची खोटी कागदपत्रे तयार करून आपल्या इतर साथीदारांना सोबत घेऊन जगदाळे यांना तीन लाख रुपये घेऊन विक्री केली. पोलिस अंमलदार संदीप घुले, अनिस शेख आणि शिवा गायकवाड यांना या टोळीची माहिती मिळाली. त्यानुसार तीघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, गुन्हे निरीक्षक गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी सुजय पवार, सोमनाथ कांबळे, दीपक खेंदाड, फिरोज शेख, प्रवीण गोडसे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news