Zilla Parishad School Development: वाळकी गावाचा आदर्श निर्णय; यात्रेचा निधी शाळेसाठी

कुस्त्यांचा आखाडा-ऑर्केस्ट्रा रद्द; ‘एक गाव, एक यात्रा’ संकल्पातून शिक्षणाला प्राधान्य
School
SchoolPudhari
Published on
Updated on

राहू: ग््राामदैवत काळभैरवनाथाच्या यात्रेनिमित्त होणारा कुस्त्यांचा आखाडा आणि ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रद्द करून, त्यातून जमा होणारा लाखो रुपयांचा निधी जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी वापरण्याचा स्तुत्य निर्णय वाळकी (ता. दौंड) ग््राामस्थांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, वर्षानुवर्षे दोन गटांत विभागलेली यात्रा यंदा एकत्रितपणे साजरी होत आहे.

School
Shirur Irrigation Project: शिरूर तालुक्यात 1100 कोटींच्या सिंचन योजनेला गती

वाळकी गावामध्ये दरवर्षी दोन गटांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने यात्रा साजरी करण्याची परंपरा होती. मात्र, यंदा दोन्ही गटांतील प्रमुखांनी आणि ग््राामस्थांनी सामंजस्याची भूमिका घेतली. गावच्या विकासासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी मतभेद बाजूला सारून “एक गाव, एक यात्रा” हा संकल्प केला.

School
Pune Government Land Violations: पुण्यात सरकारी जमिनींच्या वापरात मोठे गैरप्रकार; 353 प्रकरणे उघड

यात्रेनिमित्त ऑर्केस्ट्रा, तमाशा आणि कुस्त्यांच्या आखाड्यावर मोठी उधळण केली जाते. मात्र, वाळकी ग््राामस्थांनी अनावश्यक खर्चाला फाटा दिला असे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोरात, उत्तम थोरात यांनी सांगितले.

School
Bhigwan Stray Dogs Attack: भिगवणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 12 वर्षीय मुलगी जखमी

मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर होणारा खर्च आता शाळेच्या तिजोरीत जमा होईल. या निधीतून जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी, शैक्षणिक साहित्य आणि भौतिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

School
Bhimashankar Temple Closed Extension: भीमाशंकर मंदिर बंद कालावधी वाढला; भाविकांची नाराजी

निर्णयाचे सर्वत्र स्वागत

गावातील मुलांचे भविष्य ज्या शाळेत घडते, ती शाळा समृद्ध असावी, या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे, अशी भावना ग््राामस्थांनी व्यक्त केली. दोन गट एकत्र आल्याने गावातील सामाजिक सलोखा वाढणार आहे. दौंड तालुक्यातील इतर गावांसाठी वाळकीने एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news