Bhigwan Stray Dogs Attack: भिगवणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 12 वर्षीय मुलगी जखमी

चार-पाच कुत्र्यांचा हल्ला; आतापर्यंत 42 जण जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Stray dog attack
Stray dog attackPudhari
Published on
Updated on

भिगवण: इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हैदोस सुरूच आहे. शुक्रवारी (दि. 9) प्रभाग 1 मध्ये एका बारा वर्षीय मुलीवर चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. एका कुत्र्याने तिचा चावा देखील घेतला. तेथील शाळकरी मुले व नागरिकांनी प्रसंगावधान राखत तिची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. धनश्री भोलाराम शेलार असे जखमी मुलीचे नाव असून, तिच्यावर भिगवण येथील ग््राामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Stray dog attack
Bhimashankar Temple Closed Extension: भीमाशंकर मंदिर बंद कालावधी वाढला; भाविकांची नाराजी

या भागात आत्तापर्यंत जवळपास 42 जणांना भटक्या कुत्र्यांनी जखमी केले आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत लोखंडे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. यावरूनच भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव दिसून येतो. भोलाराम शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार धनश्री ही सकाळी किराणा वस्तू आणण्यासाठी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकानात गेली होती.

Stray dog attack
Yerawada Mental Hospital Inspection: येरवडा मनोरुग्णालयातील धक्कादायक स्थिती उघड; अचानक पाहणीनंतर चौकशीचे आदेश

त्या वेळी तिथे कळपाने उभ्या असलेल्या कुर्त्यांनी तिच्यावर हल्ला केला. भीतीने ती धावत होती तरीही एका कुत्र्याने तिच्या पायाला चावा घेतला. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या आधी देखील याच कुर्त्यांनी चार ते पाच जणांना चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Stray dog attack
Pune Yerawada Mental Hospital: येरवडा मनोरुग्णालयात गोंधळ; स्वच्छता बंद, ऐतिहासिक वस्तू भंगारात

दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भिगवण गावात अनेक चौकात व गल्लीबोळात भटकी कुत्री पहावयास मिळतात. त्यातूनच हल्ला करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Stray dog attack
Pune Metro Expansion: पुणे मेट्रो विस्ताराला वेग; वनाज-चांदणी चौक, रामवाडी-वाघोली मार्ग 2028 पर्यंत पूर्ण

गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी भिगवण ग््राामपंचायतीने कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. मोकाट कुत्र्यांच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news