Pune News| दोन वर्षांच्या चिमुरड्याचा विक्रम

पुण्यातील रिषीत बाफनाने ४० सेकंदांत सांगितली ५३ देशांची नावे
Pune News
दोन वर्षांच्या चिमुरड्याचा विक्रमFile Photo
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा सॅलिसबरी पार्क येथील विद्यासागर कॉलनीमध्ये राहणारा दोन वर्षांचा रिषीत बाफना याने अवघ्या ४० सेकंदांत न अडखळता ५३ आफ्रिकन देशांची नावे सांगितली. या विश्वविक्रमाची नोंद 'ओ. एम. जी. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' व 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' या संस्थांनी घेतली आहे.

Pune News
Money laundering Case| मनी लाँड्रिंगच्या धाकाने तरुणाकडून १९ लाख उकळले

'ओ. एम. जी. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'

बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने पुणे शहराचा झेंडा जगाच्या नकाशावर फडकविण्यात यश मिळविले आहे. लहान वयात रिषीतने केलेल्या विक्रमाचे पुणे शहरातून कौतुक होत आहे. जागतिक पातळीवरील 'ओ. एम. जी. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये सहभागी होण्यासाठी रिषीतच्या पालकांनी संस्थेच्या वेबसाइटवर तीन महिन्यांपूर्वी नोंदणी केली होती.

गेल्या एप्रिल महिन्यात संस्थेच्या पथकाने रिषीतची दृकश्राव्य माध्यमातून मुलाखत घेतली. यात त्याने ५३ आफ्रिकन देशांची नावे अवघ्या चाळीस सेकंदांत न अडखळता सांगितली. संस्थेच्या समितीने वर्ल्ड रेकॉर्ड परीक्षणाअंती रिषीतची नोंद करून त्याला सन्मानचिन्ह, गौरवपत्र प्रदान केले आहे.

Pune News
Maharashtra CM| मुख्यमंत्री महायुतीचाच होणार!

'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने या विक्रमाची नोंद घेतली

तसेच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'ने देखील या विक्रमाची नोंद घेतली आहे. रिषीतची आई दिशा बाफना ह्या न्यूमेरोलॉजिस्ट आहेत, तर वडील सागर बाफना हे ईएनटीसी डिप्लोमा शिक्षित असून, ते व्यावसायिक आहेत. रिषीतला आई- वडिलांसह आजी स्मिता आबड यांचेही मार्गदर्शन मिळाले.

रिपीत खूप कमी वयात बोलायला शिकला. एखादी गोष्ट त्याला एकदा सांगितली की तो ती लगेच 66 आत्मसात करतो. यातूनच त्याला विविध देश, प्राण्यांची नावे शिकवली. प्रचंड बुद्धिमत्तेमुळे दोन वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये त्यांच्या विक्रमाची नोंद झाली, याचा आम्हाला अभिमान आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news