Money laundering Case| मनी लाँड्रिंगच्या धाकाने तरुणाकडून १९ लाख उकळले

मनी लॉड्रिंगच्या धाकाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाकडून १९ लाख रुपये उकळल्याचा प्रकार
Money laundering Case
मनी लाँड्रिंगच्या धाकाने तरुणाकडून १९ लाख उकळलेFile Photo
Published on
Updated on

मनी लॉड्रिंगच्या धाकाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाकडून १९ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. तुमच्या विरोधात मनी लॉड्रिंगची केस दाखल झाली आहे, तुम्हाला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात यावे लागेल, अशी भीती दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

Money laundering Case
Law of Hoarding| होर्डिंगच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापणार

चंदननगर पोलिस ठाण्यात सोमनाथनगर वडगाव शेरी येथील २६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ मे २०२४ रोजी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाच्या मोबाईलवर सायबर चोरट्यांनी फोन केला. तुमचे नाव मनी लॉड्रिंगमध्ये आले आहे. तुमच्या नावाचा गैरवापर केला जात असून, त्यासाठी तुमचे आधार कार्ड व बँक खात्याचा वापर करून मनी लॉड्रिंग करण्यात आली आहे, असे सांगितले. एक लिंक पाठवत तरुणाचा विश्वास संपादन केला. त्यांनतर पोलिस अधिकारी

Money laundering Case
Shaktipeeth Highway| शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

बोलत असल्याचे सांगून चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, असे सांगून अटकेची भीती दाखवली. तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बँकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल,

असे सांगत तक्रारदार तरुणाला १९ लाख रुपये चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यावर ट्रान्सफर करायला सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक चव्हाण करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news