Maharashtra CM| मुख्यमंत्री महायुतीचाच होणार!

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा
Sunil Tatkare
मुख्यमंत्री महायुतीचाच होणार!File Photo
Published on
Updated on

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचविल्यावरून महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. पण आमच्यात मुख्यमंत्रिपदावरून कसलाही वाद नाही.

Sunil Tatkare
पुढारी विशेष: कुणी हात, तर कुणी पाय गमावले; कंपन्यांनी वाऱ्यावर सोडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे मित्रपक्ष ही निवडणूक लढवणार आहोत आणि राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महायुतीमध्ये नाराजी असल्याच्या विरोधकांच्या वावड्यांचा तटकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा राज्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे.

Sunil Tatkare
Pune| माजी भूमी अभिलेख उपसंचालकासह पत्नीवर गुन्हा

निवडणुकीतील यश-अपयशावर नेतृत्वाची उंची मोजली जात नाही. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत लोकसभा निवडणूक निकालानंतर दिल्लीत आयोजित केलेल्या घटक पक्षांच्या बैठकीत शहा यांनी अजित पवार यांना स्वतःच्या बाजूला बसविले होते.

इतकेच नाही तर बैठकीत त्यांचा सन्मानही केला. सत्तेवर येण्याचे विरोधकांचे स्वप्न भंगल्यामुळे ते अजित पवार यांच्या बद्दल अशाप्रकारे प्रचार करत असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

Sunil Tatkare
Money laundering Case| मनी लाँड्रिंगच्या धाकाने तरुणाकडून १९ लाख उकळले

अजित पवार यांचे महायुतीमध्ये राजकीय वजन कमी?

अजित पवार यांचे महायुतीमध्ये राजकीय वजन कमी झाले असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या भेटीसाठी त्यांना ४० ते ५० पत्रे पाठवायची, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अजित पवार यांच्या भेटीची का आस लागावी, असा सवालही तटकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये कसलाही वाद नाही. जागावाटप सन्मानजनक होईल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही केवळ सत्ता आणि निवडणुकांसाठी एकत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news