Pune News| पुणे तेथे काय उणे! हेल्मेट परिधान न केल्याचा चक्क रिक्षाचालकाला दंड

दंड न भरल्यास खटला भरण्याचे नोटिशीत नमूद : समाज माध्यमावर प्रकार व्हायरल
Rickshaws
हेल्मेट परिधान न केल्याचा चक्क रिक्षाचालकाला दंडRickshaw file photo
Published on
Updated on

पुण्यात दुचाकीसोबत माणसाला टोइंग करून गाडीत चढविल्याचा, टोइंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा, तर नुकताच वाहतूक पोलिसांवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या अजब घटना घडल्या असतानाच त्यात वाहतूक पोलिसांशी निगडित आणखी एका घटनेची भर पडली आहे.

Rickshaws
मराठा आरक्षण : 'सगेसोयरे'वर आठवड्यात निर्णय शक्य? हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासाठी शिष्टमंडळ

पोलिसांनी वाहतूक एका रिक्षाचालकाला हेल्मेट न घातल्याप्रकरणी दंडाची नोटीस बजावली आहे. जर दंडाची रक्कम नाही भरली, तर तुमच्यावर न्यायालयात खटला भरला जाईल, असेही नोटिशीमध्ये सूचित करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांचा अशा प्रकारामुळे समाज माध्यमांवर हा प्रकार चांगलाच व्हायरल झाला आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न चांगला तापत असताना दुसरीकडे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी व नियम-अटी पाळल्या जाव्यात, यासाठी चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मात्र, असताना एका रिक्षाचालकाला हेल्मेट घातले नाही म्हणून दंडाच्या रकमेबाबत नोटीस पाठविण्यात आली.

Rickshaws
Monsoon Live Update| मुसळधार! अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, एनडीआरएफची पथके तैनात

तसेच, त्याला ही रक्कम न भरल्यास न्यायालयात खटला भरण्याबाबतही सूचित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात दुचाकीवर हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात येतो. मात्र, रिक्षावर हेल्मेट नसल्याचा दंड ठोठावताना संबंधित कर्मचाऱ्याकडून असा प्रकार कसा घडला, असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

याबाबत रिक्षाचालकाने लागलीच पुणे जिल्हा महाराष्ट्र वाहतूक शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) दत्तात्रय घुले यांना माहिती दिली. त्यानंतर वाहतूक पोलिसांचा हा गलथान प्रकार समोर आला आहे. प्रत्यक्षात ही बाबत तांत्रिक चुकीमुळे झाली असण्याची शक्यता पाहता व न्यायालयात खटला जाण्याची शक्यता पाहता नोटीस काढणाऱ्या किंवा मेसेज पाठविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याबाबतीत सतर्क राहिले पाहिजे, अशी अपेक्षा सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

मी रिक्षाचालक आहे. माझ्या रिक्षावर विदाऊट हेल्मेट गाडी चालवत असल्याचा व ५०० रुपये दंड पडल्याचा मेसेज आला. प्रत्यक्षात मेसेजमध्ये देण्यात आलेला नंबर हा रिक्षाचा होता. रिक्षावर हेल्मेट परिधान न केल्याचा दंड कसा म्हणून मीच आश्चर्यचकित झालो.

योगेश सोनावणे, रिक्षाचालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news