Monsoon Live Update| मुसळधार! अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, एनडीआरएफची पथके तैनात

आज दिवसभरातही मुसळधार पावसाची शक्यता
Monsoon Live Update
मुसळधार! अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, एनडीआरएफची पथके तैनातFile Photo

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिवसभरातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ठाणे, वसई (पालघर), महाड (रायगड), चिपळूण (रत्नागिरी), कोल्हापूर, सांगली, सातारा घाटकोपर, कुर्ला आणि सिंधुदुर्ग येथे एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. 

रस्त्यावरील वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू; मुख्यमंत्र्यांची माहिती

File Photo
File Photo

मुंबईतील पावसाबद्दल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सर्व रस्त्यांवर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. शहरातील सर्व पाणी साचलेल्या ठिकाणांवर बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, एनडीआरएफ, बीएमसी अलर्टवर आहेत. वाहतूक सुरू आहे. ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे आणि सर्व रेल्वे लाइन्स राज्याच्या तीनही किनारी जिल्ह्यांमध्ये पोहोचल्या आहेत.

पनवेल तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले

Panvel Rain Update
पनवेल तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले Pudhari Photo

पनवेल महानगरपालिका हद्दीतील पडघे गावात एक रिक्षा पावसाच्या पाण्यात वाहून गेली. सुदैवाने या रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. रविवार 7 जुलै रोजी पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पडघे गावातील छोट्याशा ब्रिजवर उभी ठेवण्यात आलेली रिक्षा या पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली.

राजाराम बंधाऱ्यातील पाणी पातळी ३२' ११

राजाराम बंधारा
राजाराम बंधारा

१२:०० वाजता, राजाराम बंधाऱ्यातील पाणीची पातळी ३२' ११ (५४०.२२ मीटर) आणि विसर्ग ३३,५६२ क्युसेक्स असून, नदीची इशारा पातळी ३९' ००" आणि धोका पातळी ४३' ००" असून. एकूण ५७ बंधाऱ्यात पाण्याखाली आहेत.

समुद्रात उंच लाटा; NDRF पथकं तैनात

पुढील २ ते ३ तासांत मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान समुद्रात देखील उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने किनापट्टीलगत एनडीआरएफची पथकं तैनात केली आहेत.

११:०० AM| राजारामबंधाऱ्यातील पाणी पातळी ३२ फूट ०९ इंच

Kolhapur: Water on Rajaram Dam; At a level of 32 feet
राजारामबंधाऱ्यातील पाणी पातळी ३२ फूट ०९ इंच Pudhari Photo

कोल्हापूर येथे आज सकाळी ११:०० वाजेपर्यंत राजारामबंधाऱ्यातील पाणी पातळी ३२ फूट ०९ इंच (५४०.१७ मीटर) इतकी नोंदवली गेली आहे, तर विसर्ग ३३,४७० क्युसेक इतका आहे. नदीची इशारा पातळी ३९ फूट आणि धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या ५७ बंधारे पाण्याखाली आहेत. मागील २ तासात ४ इंचाने पातळीत वाढ.

किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

Cloudburst-like rain on fort Raigad
किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊसFile Photo

मागील १८ तासांत महाड शहरासह ग्रामीण भागात, विशेष करून रायगड वाळण बिरवाडी विभागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. काल सायंकाळी उशिरा किल्ले रायगड परिसरातही ढगफुटी सदृश्य झालेल्या मुसळधार पावसाने शेकडो शिवभक्तांना जीव मुठीत धरून किल्ले रायगडावरून पायरी मार्गाने खाली उतरावे लागले. 

आ.अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांचा ट्रॅक वरून पायी प्रवास 

आ.अमोल मिटकरी आणि आमदार अनिल पाटील यांना मुसळधार पावसाचा फटका. लांब पल्ल्याची एक्सप्रेस बंद पडल्याने कुर्ला स्टेशन येथून ट्रॅक वरून सुरू केला पायी प्रवास.

चेंबूरच्या भारतनगरात घरांचे पोटमाळे कोसळले!

चेंबूरच्या वाशीनाका भारतनगर येथील भीम टेकडी सिद्धार्थ बुद्ध विहाराच्या मागे असलेल्या तीन घरांचे पोटमाळे कोसळल्याची घटना सोमवारी रात्री २ च्या दरम्यान कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी घरातील सामानाचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले आहे.

चेंबूरच्या भारतनगरात घरांचे पोटमाळे कोसळले!
चेंबूरच्या भारतनगरात घरांचे पोटमाळे कोसळले!File Photo

मुंबईतील शाळांना दुसऱ्या सत्रातही सुट्टी जाहीर

मुंबईतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज शाळांना दुसऱ्या सत्रासाठीही सुट्टी जाहीर केली आहे. सुरुवातीला शाळांना सकाळच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

Mumbai
मुंबईतील शाळांना दुसऱ्या सत्रातही सुट्टी जाहीरPudhari File Photo

कोकणाला पुरस्थितीचा इशारा

केरळ ते कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण अन् घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला असून आगामी 24 ते 48 तास कोकण किनारपट्टीला पूरस्थितीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी

"मुंबईत आजही मुसळधार पाऊस (Mumbai rains) पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईतील सर्व बीएमसी, सरकारी आणि खासगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राबाबत निर्णय कळवला जाईल." असे BMC ने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news