

तळेगाव दाभाडे (पुणे) : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील खरीप भातपिकाच्या रोपांना जीवदान मिळाले आहे. मावळ तालुक्यात शनिवारपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. सर्वत्र पाऊस पडला असल्याने बळीराजा समाधान व्यक्त करीत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शेतक-यांनी भाति पकाच्या रोपांच्या पेरण्यांची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठीचे बि-बियाणे, खते यांची जमवाजमव करून ठेवलेली होती. तर, काही शेतकर्यांनी धूळ वाफेवर भातपिकाच्या पेरण्या केल्या होत्या. मान्सूनच्या पावसाचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, सर्वत्र पाउस पउत असल्यामुळे शेतकरी आनंदीत आहेत.
तालुक्यात खरीप भातपिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. दरवर्षी तालुक्यात सुमारे 13 हजार हेक्टरवर पीक घेतले जाते. तर, यावर्षी ही खरीप भातपिक उत्पादक शेतकर्यांनी इंद्रायणी भाताला सर्वांधिक पसंती दिली आहे. तालुक्यात 80 ते 85 टक्के क्षेत्रावर इंद्रायणी भाताची पेरणी केली जात आहे.
हेही वाचा: