

पिंपरी (पुणे ), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून संभाजीनगर, चिंचवड येथील बर्ड व्हॅली खाण, भोसरी तलाव आणि निगडी, प्राधिकरणातील गणेश तलाव या तीन तलावांचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 17 कोटी 22 लाख 6 हजार 748 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
बर्ड व्हली, भोसरी तलाव व गणेश तलाव या तीन तलावांचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण करण्याचे काम 15 व्या वित्त आयोगांतर्गत केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून सर्व खर्चासहित 16 कोटी 55 लाख 83 हजार 412 रुपये इतक्या खर्चाची निविदा काढण्यात आली होती. त्यात पाच ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. या ठेकेदार कंपनीची निविदा दरापेक्षा 4 टक्के जास्त दराची निविदा पात्र ठरली आहे.
डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट्सची एकूण 17 कोटी 22 लाख 6 हजार 748 रुपयांची निविदा पर्यावरण विभागाने स्वीकृत केली. या ठेकेदाराला काम देण्यास व खर्च करण्याचा प्रस्तावास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.27) स्थायी समितीची मान्यता दिली. बर्ड व्हॅली खाण, भोसरी तलाव आणि निगडी प्राधिकरणातील गणेश तलावांचे नैसर्गिकरित्या पुनरुज्जीवन करून परिसराचे सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार आहे.
हेही वाचा: