Revenue Employees Strike: महसूल कर्मचाऱ्यांचा संप; आंबेगाव तालुक्यात कामकाज ठप्प, शेतकरी अडचणीत

सातबारा, फेरफार, पीकविमा व नुकसान भरपाईचे अर्ज रखडले; प्रशासनाकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
Revenue Employees Strike
Revenue Employees StrikePudhari
Published on
Updated on

मंचर : महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या संपामुळे आंबेगाव तालुका महसूल विभागाचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. निलंबित तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांना पुन्हा सेवेत घेणे, नायब तहसीलदार ग्रेड पे, कालबद्ध पदोन्नती तसेच तहसीलदार ग्रेड पे आदी मागण्यांसाठी हा संप सुरू असून, त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे.

Revenue Employees Strike
Liver disease due to Addiction: एकच प्याला, आयुष्यावर घाला! यकृताच्या आजाराने तरुणाई मृत्यूच्या उंबरठ्यावर

सातबारा उतारे, फेरफार नोंदी, पीक पाहणी, नुकसान भरपाई प्रस्ताव, विविध दाखले, वारसा नोंदी, जमिनीची मोजणी आदी महत्त्वाची कामे प्रलंबित राहिली आहेत. रब्बी हंगामाच्या तोंडावर आवश्यक कागदपत्रे वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांची धावपळ वाढली आहे.

Revenue Employees Strike
Avishkar Research Competition: ‘आविष्कार 2025’ संशोधन स्पर्धेत पवार महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

अनेक गावांतील तहसील कार्यालयांत शुकशुकाट पसरला असून, अर्ज स्वीकारणे तसेच निर्णयप्रक्रिया पूर्णतः बंद आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासनाशी संबंधित असल्या तरी त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः कर्ज प्रकरणे, पीकविमा दावे, नुकसान भरपाई तसेच विविध शासकीय योजनांचे लाभ अडकल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून या संपावर तोडगा काढावा व महसूल कार्यालयांचे कामकाज सुरळीत करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Revenue Employees Strike
Voice of Common Citizen: लोकशाहीत नागरिक फक्त मतांचा आकडा बनतोय का?

संपामुळे सातबारा व फेरफार नोंदी रखडल्या आहेत. नुकसान भरपाईचे अर्जही पुढे जात नाहीत. कार्यालयात कोणीच नसल्याने रोज चकरा माराव्या लागत आहेत.”

ऋषिकेश गावडे, शेतकरी, गावडेवाडी

Revenue Employees Strike
Panshet Dam Drowning: मद्यप्राशन करून पोहण्याचा हव्यास जिवावर बेतला

कर्ज व पीकविम्याच्या कामांसाठी आवश्यक कागदपत्रे अडली आहेत. पेरणी व पिकांची कामे सुरू असताना महसूल कार्यालय बंद असल्यासारखी परिस्थिती आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.”

प्रा. दत्तात्रय भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस नेते, कळंब

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news