Pune News: हजेरी लावा, फोटो काढा अन् घरी जा! येरवडा परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा

नागरिकांकडून कारवाईची मागणी
Pune News
Pune NewsPudhari
Published on
Updated on

येरवडा: महापालिकेचा पगार हवाय, पण काम नको..! येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातील श्रीमाळ आरोग्य कोठीमधील महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. हजेरी लावून फोटो काढायचा आणि सरळ घरी निघून जायचे, असा प्रकार इथे सुरू असल्याचा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे.

या आरोग्य कोठीवर एकूण २४ कर्मचारी आणि ४ कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. बुधवारी सकाळी नागरिकांनी या कर्मचाऱ्यांची पाहणी केला असता हजेरी मस्टर फक्त १६ जण उपस्थित असल्याचे आढूळन आले.

Pune News
Chain Snatching: 'लुटारूंना' वेसण! पोलिसांचा चोरट्यांना दणका

त्यातही केवळ २ महापालिका कर्मचारी आणि २ ठेकेदारी तत्त्वावरील कर्मचारी प्रत्यक्षात काम करताना दिसून आले. सकाळी अकरा वाजेपर्यंत उपस्थिती अवघी १० वर पोहोचली. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे एकाही कर्मचाऱ्याच्या अंगात गणवेश नव्हता, तसेच गळ्यात ओळखपत्रही नव्हते, असे सामाजिक कार्यकर्ते उमेश मोरे यांनी सांगितले.

करदात्यांच्या पैशातून पगार घेऊन असे कामचुकारपणा चालणार नाही. अनुपस्थित कामगार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Pune News
Pune News: खाकीचाच गुटख्यावर डल्ला? बॉक्स गायब करतानाचे व्हिडीओ व्‍हायरल

एकंदरीत कोठीत कामापेक्षा 'हजेरीचा खेळ' जास्त सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. परिसरात अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

लक्ष्मीनगर परिसराच्या स्वच्छतेबाबत कर्मचारी हलगर्जीपणा करीत असतील, तर ही गंभीर बाब आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून स्वच्छतेबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल.

- नीलेश आल्हाट, नगरसेवक

कर्मचाऱ्यांची घरे जवळच आहेत. त्यामुळे कामे आटोपून ते घरी जाऊन पुन्हा कामावर येतात. यापुढे गणवेश आणि ओळखपत्र न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

- सचिन निकाळजे, आरोग्य अधिकारी, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news