पुणे : राज्यात यंदाच्या रब्बी हंगामातील दुष्काळी स्थितीमुळे रासायनिक खतांचा वापर गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 3.30 लाख टनांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात गतवर्षी 12 डिसेंबरला 10 लाख 10 हजार 515 टनाइतकी झालेली रासायनिक खतांची विक्री चालू वर्षी 12 डिसेंबरपर्यंत 6 लाख 80 हजार 422 टन झाल्याचे ताज्या अहवालावरून स्पष्ट झाल्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी सांगितले.
राज्यात रब्बी हंगामात पिकांखालील सरासरी क्षेत्र 54 लाख हेक्टर असून कृषी विभागाने 62 लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्यांचे नियोजन केले आहे. रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, गहू या पिकांबरोबर भाजीपाला लागवडीकडे शेतकर्यांचा कल राहतो. गतवर्षी रब्बी हंगाम 2022-23 मध्ये एकूण खतांचा पुरवठा 28 लाख 9 हजार टनाइतका करण्यात आला होता. तर चालूवर्षी 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी एकूण खतांचा 29 लाख 60 हजार टनांइतका खत पुरवठा करण्याचे कृषी आयुक्तालयाचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.
पुणे जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खतांची शेतकर्यांकडून गरजेइतकी खरेदी होत आहे. मात्र, उर्वरित दुष्काळी पट्ट्यात तुलनात्मकदृष्ट्या खतांना मागणी रोडावली आहे. कारण पाण्याची सरसकट शाश्वत उपलब्धता नसल्याने पिकांसाठी रासायनिक खतांच्या खरेदीस शेतकर्यांनी हात आखडता घेतल्याचे दिसून येते.
– महेश मोरे, पुणे डिस्ट्रिक्ट फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन.
खते 12 डिसेंबर 22 12 डिसेंबर 23
हेही वाचा