Pune Traffic | रस्ते राहणार केंद्रस्थानी; वाहतूक विभागाची पुनर्रचना

वाहतूक कोंडीमुक्त पुण्यासाठी पोलिसांचा निर्णय
Roads will be central; Reorganization of Transport Department
Roads will be central; Reorganization of Transport DepartmentFile Photo

अशोक मोराळे

पुणे : शहरातील सर्व वाहतूक विभागांची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, लवकरच याची अंमलबजावणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जसे पोलिस ठाण्यांचे कामकाज असते, तसे वाहतूक विभागाचे काम रस्त्याप्रमाणे चालते. (Pune Traffic News)

Roads will be central; Reorganization of Transport Department
kolhapur flood update | पंचगंगेने ओलांडली धोका पातळी; कोल्हापूरकरांचा जीव टांगणीला

त्यामुळे रस्त्यांना केंद्रस्थानी ठेवून ही पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत २८ वाहतूक विभाग आहेत. या विभागांमार्फत शहरातील वाहतुकीचे नियमन केले जाते.

आता या सर्व विभागांतील रस्त्यांचा नव्याने अभ्यास आणि नियोजन करून १८ विभागांत नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहे. म्हणजेच, यानंतर वाहतूक विभागाचे कामकाज या १८ विभागांमार्फत चालणार आहे. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली है कामकाज सुरू आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहने, अरुंद रस्त आणि त्यातही रस्त्याच्या कडेला झालेले अतिक्रमण, यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून, नागरिकांना तासन् तास कोंडीत अडकाचे लागत आहे.

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर सध्या वाहतुकीचा वेग अत्यंत कमी आहे. परिणामी, पर्यायी आणि मुख्य रस्त्याना जोडल्या जाणाऱ्या इतर रस्त्यांबर देखील वाहनधारकांची संख्या वाढून कोंडी होते. या सर्व पार्श्वभूमीवर शहर वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिका यांच्या समन्वयातून एकत्रितपणे काम केले जाणार असून, प्रामुख्याने रस्त्यांवरील वाहतुकीचा वेग चाविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

त्यातच आता माहतूक विभागाची नव्याने पुनर्रचना करण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नुकतीच 'मिशन धर्ती टू' या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रमुख ३२ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. या रस्त्यांवर जर वाहतूक कोंडी झाली, तर शहर जाम होते, असे निदर्शनास आले आहे.

Roads will be central; Reorganization of Transport Department
MLA Hiraman Khoskar | आमदार खोसकरांवर कारवाई अटळ, 'या' नेत्याने दिली मोठी माहिती

१ ऑगस्टपासून या रस्त्यावर प्रायोगिक उपक्रमास सुरुवात होणार आहे. त्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनाकडून संयुक्तरीत्या प्रयत्न केले जाणार आहेत. या रस्त्यांवर पार्किंग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधने, चौक सुधारणा, अशी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी वाहतूक विभाग आणि महापालिका यांच्या समन्वयातून स्वतंत्र अॅप्लिकेशन तयार केले जाणार आहे.

अशी होणार नव्याने वाहतूक विभागाची पुनर्रचना

हडपसर व लोणी काळभोर: सोलापूर रोड-भैरोबानाला ते पोलिस आयुक्तालय हर, सासवड रोड, शिवरकर रोड, बी. टी. कन्वडे रोड.

वानवडी व लष्का: सोलापूर रोड-धोबी घाट हे भैरोबानाला चौक, भैरोबानाला चौक ते लुल्लानगर चौक, लुल्लानगर चौक ते गोळीबार मैदाना चौक, एमजी रोड कोयाजी मार्ग व ईस्ट स्ट्रीट, रेसकोर्स ते सामू वासवानी चौक.

बंडगार्डन: तीन तोफा चौक ते आआंबेडकर रोड, शाहीर अमर शेख मौक, नेहरू मेमोरीयल हे जहांगीर हॉस्पिटल, साधु वासवानी जंक्शन, एसजीएस मॉल ते मंगलदास चौक, मोचीज ते एमजी रोड, कोरेगाव पार्क जंक्शन ते ब्लू डायमंड जं. साधु वासवानी पुल, आरटीओ ते संगम बीज

समर्थ व फरासखाना: मालधवका चौक ते सेव्हन लव्हज चौक, शाहीर अमर शेख चौक ते गाडीतळ पुतळा, लक्ष्मीरोड ते खेलबाग मौक

विश्रामबाग व खहक: बाजीराव रोह-सावरकर पुतळा ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड-गाडगीळ पुतळा ते जेथे चौक, टिळक चौक जेधे चौक ते अलका टॉकीज चौक, लक्ष्मी रोड-बेलबाग ते अलका टॉकीज चौक, अलका चौक

दत्तवाडी: शाखी रोड-पूना हॉस्पिटल पर्यंत, सिंहगड रोड ते वडगाव ब्रीज, कल्य निलायम टॉकीज, विश्व, सेनादत्त चौक ते म्हात्रे बीज,

स्वारगेट व सहकारनगर: सातारा रोड जेधे सौफ ते पद्मावती चौक, सेरहन लव्हज चौक ते गंगाधाम चौक, पुष्पमाल ते कॅप्टन विक्रम बत्रा एनक्लेव्ह पाण्याची टाकी, बिबवेवाडी रोड, सहकारनगर रोड भारती विद्यापीठ पद्मावती ते कात्रज बोगदा, कात्रज ते नवले ब्रीज, कात्रज ते कारव्हा हॉटेल चौक उंड्री पिसोळी, हांडेवाडी कान्हा हॉटेल चौक ते मंतरवाड़ी, खड़ी मशीन जंक्शन ते बोपदेव घाट, फुरसुंगी रेल्वे बीज ते दिवे घाट

कोडवा: सुल्लानगर चौक ते खड़ी मशीन चौक, एनआयबीएम रोड, सय्यदनगर ते उंड्री, लुल्लानगर चौक ते कॅप्टन विक्रम बत्रा एनक्लेव्ड- पाण्याची टाकी शिवाजीनगर,

डेक्कनः संचेती चौक ते कोर्ट, मनपा भवन, गाडगीळ पुतळा, खंडोजीबाचा ते नळस्टॉप ते पौड फाटा, नळस्टॉप ते सेनादत्त पोलिस चौकी, बर्वे रोड, एफसी रोड, जंगली महाराज रोड, भांडारकर रोड जंक्शन ते नळस्टॉप.

चतुः शृंगी: गणेशखिंड रोड संचेती चौक ते विद्यापीठ चौक, औप रोड, बाणेर रोड, पाषाण रोड, सेनापती बापट रोड ते सिम्बायोसीस कॉलेज जंक्शन, खडकी व विश्रांतवाडी जुना पुणे मुंबई रस्ता आरटीओ चौक ते हरीस बीज, आळंदी रोड, जेलरोड.

येरवडा व विमानतळ : पर्णकुटी चौकी चौक ते खराडी, खराडी जंवशन ते मुंद्रथा, नवीन विमानतळ रोड, जुना विमानतळ रोड, लोहगाव,

लोणीकंद: खराडी वायपास ते भिमा कोरेगाव. कोरेगाव पार्क व मुंडवा ताडीगुत्ता हे चुलमटण,

कोधराड: पौड रोड ते बारजे जंक्शन, पौड रोड, बार्वे पुतळा ते वारजे पुल, वारजे पुल ते चांदणी चौक सिंहगडरोड, वारजे नवीन कात्रज बोगदा ते चांदणी चौक, वायपास रोहयी पश्चिम बाजू

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news