.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कडूस, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः कुंडेश्वर डोंगर परिसरात सतत संतधार सुरु आहेत. कडूस गावाला वरदान ठरलेला २.६२ लशलक्ष घनमिटर क्षमता असलेला पाझर तलाव आज (दि. २५) १०० टक्के भरला. सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे कडूस गावच्या स्मशानभूमित पाणी शिरले आहे. (Pune Rain News)
पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रांत मागिल २४ तासामध्ये ९० मिलिमिटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. मागिलवर्षी हाच पाझर तलाव दि. १ आँगस्ट रोजी भरला होता. मागिल वर्षीच्या तुलनेने तब्बल सात दिवस अधिच पाझर तलाव भरला आहे.
पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. कोहिंडे बुद्रुक येथिल रौंधळवाडीचा पाझर तलाव ओहोरफ्लो झाला आहे. संपूर्ण पाणी कङूस गावच्या पाझर तलावाला मिळत असल्याने पाझर तलावात येणारी पाण्याची आवक कमी जास्त होत आहे. पाझर तलावाला स्वयंचलित दरवाजे नसल्याने कुमंडला नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान परिसरातील पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांचा एकमेव आधार असलेला पाझर तलाव भरल्याने हजारो हेक्टर शेत जमिनी सह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून शेतकरी बांधवां सह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.