

सुभाष किवडे
पुणे : तुटवड्यामुळे सर्व प्रकारच्या मिरचीच्या दरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, दराने विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या आठवडाभरात दरात क्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपयांची वाढ झाली आहे. डाळींची दरवाढ थांबली असून, तूरडाळ आणि उडीदडाळीचे दर काही प्रमाणात उतरले आहेत. आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व जिनसांचे दर स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
हंगामाचा शेवटचा कालावधी असल्यामुळे मिरचीची आवक कमी प्रमाणात होत आहे. सध्या प्रामुख्याने शीतगृहांतील मिरचीची आवक होत असून, मागणीच्या तुलनेने आवक कमी असल्याने सर्व प्रकारच्या मिरचीचे दर कडाडले आहेत. गेल्या काही दिवसात गुंटूर, ब्याडगी तसेच लवंगी मिरचीचे दर क्विंटलमागे सुमारे पाच ते सहा रुपयांनी वाढले आहेत. सर्वांत कमी दराने उपलब्ध असणाऱ्या खुडवा मिरची दरात क्विंटलमागे 2 ते 3 हजार रुपयांची दरवाढ झाली आहे. सध्याचे दर विक्रमी मानण्यात येत आहेत. नव्या मिरचीची आवक सध्या तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे. येत्या पंधरा दिवसांत नवी मिरची बाजारात उपलब्ध होईल.
सर्वसाधारणपणे नवा हंगाम सुरू झाल्यानंतर मसाला उत्पादक तसेच घरगुती वापरासाठी मसाला तयार करणाऱ्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी होते. मात्र, पावसामुळे यंदा मिरचीच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यामुळे मिरचीचे दर कमी होण्याची शक्यता दिसत नाही, असे मत राजेंद्र गुगळे या पेढीचे सोपान राख यांनी व्यक्त केले.
उंच दरात मागणी कमी झाल्यामुळे आणि आयाती मालाचा पुरवठा वाढल्याने गेल्या आठवड्यात डाळींची दरवाढ थांबली होती. तूरडाळ आणि उडीदडाळीचे दर क्विंटलमागे 300 ते 300 रुपयांनी कमी झाले. मात्र, आवक-जावक साधारण असल्यामुळे अन्य सर्व डाळी तसेच कडधान्यांचे दर स्थिर होते. आवक-जावक साधारण असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरी तसेच आटा, रवा आणि मैद्याचे दर स्थिर होते.
साखरेस मागणी चांगली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने शीतपेय आणि आईस्क्रीम उत्पादकांकडून साखरेस मागणी वाढत आहे. यामुळे गेल्या आठवड्यात साखरेचे दर टिकून होते. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रतिक्विंटलचा दर 4000 ते 4050 रुपये होता. उसाच्या तुटवड्यामुळे गुळाचे उत्पादन मंदावले आहे. यामुळे बाजारात गुळाची आवक कमी प्रमाणात होत असल्याने गुळाचे दर टिकून असल्याचे सांगण्यात आले. शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांचे दरही टिकून होते. शेंगदाण्याचा तुटवडा असून दरवाढ कायम असल्याचे सांगण्यात आले.
येथील घाऊक बाजारातील शनिवारचे दर पुढीलप्रमाणे होते. साखर (प्रतिक्विंटल) 4000-4050 रु. खाद्यतेले (15किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2800-2900, रिफाईंड तेल 2300-3100, सरकी तेल 2030-2400, सोयाबीन तेल 2030-2300, पामतेल 1950-2250, सूर्यफूल रिफाईंड तेल 2280-2400, खोबरेल तेल 4800 वनस्पती 1900-2300 रु. तांदूळ:- गुजरात उकडा 3500-4000, मसुरी 3500-4000, सोना मसूरी 4500-5000, एच.एम.टी. कोलम 5500-6500, लचकारी कोलम 6500-7000, चिन्नोर 4500-5000, 1121-11000-11500, आंबेमोहोर (सुवासिक) 14000-16000, बासमती अखंड 12000-13000, बासमती दुबार 9500-1000, बासमती तिबार 10000-10500, बासमती मोगरा 5500-6500, बासमती कणी 4000-4500, 1509-8500-9500,
इंद्रायणी 5500-6000 रु. गहू - लोकवन नं. 1 4050-4250, लोकवन नं. 2 3650-4050, नं.3 3350-3650, सिहोर नं. 1 5700- 6000, सिहोरी 3850-4450, मिलबर 3250-3300 रु. ज्वारी :- गावरान नं. 1 5700-6200, गावरान नं.2 5200-5500, नं.3 4700-5100, दूरी नं.1 3800-4000, दूरी नं. 2 3500-3700 रु बाजरी:- महिको नं.1 4000-4200, महिको नं.2 3600-3800, गावरान 3300-3500, हायब्रीड 3200-3300 रु. गूळ :- गूळ एक्ष्ट्रा 4600-4700, गूळ नं. 1 4350-4550, गूळ नं.2 4050-4200 गूळ नं.3 3850-4000, नं. 4 - 3650-3800, बॉक्स 4000-5000 रु. डाळी:- तूरडाळ 10000-12900, हरभराडाळ 7100-7200, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7300- 7400, मटकीडाळ 8400-8500, उडीदडाळ 10000-12500 रु. कडधान्ये:-हरभरा 6200-6500, हुलगा 4500-5000 चवळी 7000-9500, मसूर 6600-6700, मूग 9000- 9500.