Pune Mayor Election: चार वर्षांनंतर पुण्याला आज महापौर-उपमहापौर

भाजपचे बहुमत ठाम; निवडणूक औपचारिक, मात्र काँग्रेस रिंगणात उतरल्याने बिनविरोध नाही
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे : तब्बल चार वर्षांनंतर आज सोमवारी पुणे शहराला महापौर व उपमहापौर मिळणार आहेत. महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. भाजपकडे पूर्ण बहुमत असल्याने या दोन्ही पदांवर भाजपचेच उमेदवार विजयी होणार असल्याने ही निवडणूक औपचारिकता ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस मात्र निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Municipal Corporation
Shahu Maharaj Archives: शंभुपुत्र शाहू महाराजांचा इतिहास अजूनही ‘नजरकैदेत’

महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 119 नगरसेवक निवडून आले आहेत, तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे 27, काँग्रेस 15, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चे 3 आणि शिवसेना (उबाठा) 1 असे संख्याबळ आहे. महापौरपदासाठी भाजपने ज्येष्ठ नगरसेविका मंजूषा नागपुरे, तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. तर, राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी शीतल सांवत, तर उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट, काँग्रेसकडून अश्विनी लांडगे व साहिल केदारी यांनी अर्ज भरले आहेत. महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे दोन्ही पदांवर भाजपचा विजय निश्चित आहे. मात्र, तरीही ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन्हीही उमेदवारांचे अर्ज माघारी घेतले जातील, अशी शक्यता आहे. तर, काँग्रेस मात्र निवडणूक लढविणार असल्याचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी सांगितले.

Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation: महापालिकेत आलिशान गाड्यांची खरेदी; जुन्या वाहनांचा हिशेब कुठे?

महापौरपदासाठी सकाळी 11 वाजता मतदान

महापौर व उपमहापौरपदासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सकाळी 11 वाजता या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रत्येक सदस्याला हात वर करून स्वत:चे नाव सांगून आपण कोणाला मतदान करणार आहे, हे सांगावे लागणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी महापौरपदाचा निकाल जाहीर करतील. याच पद्धतीने उपमहापौरपदासाठी मतदान होणार आहे.

Pune Municipal Corporation
Folk Literature Committee: लोकसाहित्य समिती अस्तित्वात, पण काम ठप्प; निधी असूनही प्रकल्प रखडले

विजयोत्सव साजरा करणार नाही

उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर भाजपकडून कोणत्याही प्रकारचा जल्लोष साजरा केला जाणार नाही. कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा करू नये, असे आवाहन भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी केले आहे. तर, महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर लगेचच सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्य सभेत श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news