पुणे : ‘नीट’साठी यंदा आले विक्रमी अर्ज; 18 लाखांहून जास्त जणांनी केली नोंदणी

पुणे : ‘नीट’साठी यंदा आले विक्रमी अर्ज; 18 लाखांहून जास्त जणांनी केली नोंदणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या 'नीट'साठी यंदा देशात आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक नोंदणी करण्यात आली आहे. देशातील 18 लाख 72 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यापैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थी असून, राज्यातील 2 लाख 55 हजार 258 विद्यार्थी नीट परीक्षेला बसणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या सीईटी सेलकडून अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या सीईटी परीक्षेसाठी 6 लाख 89 हजार 496 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर एमबीएच्या प्रवेश परीक्षेसाठी 1 लाख 60 हजार 781 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा देणार्‍या एकूण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिली, तर आतापर्यंत राज्यातील 11 लाख 22 हजार 268 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

वैद्यकीय प्रवेशांसाठी घेण्यात येणारी 'नीट' परीक्षा असेल किंवा एमबीए आणि अभियांत्रिकी पदवी प्रवेशांसाठी घेण्यात येणार्‍या सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) असतील. या सर्वच परीक्षांसाठी यंदा विद्यार्थ्यांची विक्रमी नोंदणी होत आहे. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news