पुणे : सेना, काँग्रेससोबतीचा राष्ट्रवादीचा सूर; अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री घेणार

AGhadi
AGhadi
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठकीत उमटला. या दोन्ही पक्षांनी अवास्तव जागांची मागणी केली तर स्वबळावर निवडणूक लढवावी, असे या वेळी निश्चित करण्यात आले.
यासंबंधीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट स्वबळाचा नारा दिला होता. त्यावर सेनेनेही स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला. महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार का, याबाबत अद्याप संभ्रम आहे. यासंदर्भात मते जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल व्यवहारे, कुमार गोसावी, माजी महापौर अंकुश काकडे, दत्ता धनकवडे, वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह माजी उपमहापौर दीपक मानकर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस व शिवसेनेबरोबर या बैठकीत मते जाणून घेण्यात आली. यात बहुतांश जणांनी भाजपला रोखण्यासाठी आघाडी करून निवडणूक लढविली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर काहींनी प्रभाग रचना पक्षासाठी अनुकूल झाली आहे, त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढवून ताकद अजमावून बघितली पाहिजे, असेही मत व्यक्त केले. दरम्यान, आघाडीसाठी दोन्ही पक्षांना देण्यात येणार्‍या जागांबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांना 2017 मध्ये मिळालेल्या एकूण जागा आणि दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या जागा या फॉर्म्युल्यानुसारच जागा वाटप व्हावे. अवास्तव जागांची मागणी केली तर पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवावी, असे बैठकीत ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यावर यासंबंधीचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णयही एकमताने घेण्यात आला.

काँग्रेस व शिवसेनेबरोबर आघाडी करण्यासंदर्भात पदाधिकार्‍यांची मते जाणून घेण्याबाबत प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. त्यात यासंबंधीचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असे ठरले. मात्र, जो काही निर्णय असेल, तो लवकरात लवकर म्हणजेच फेब—ुवारीअखेरपर्यंत घ्यावा, अशी भूमिका सर्वांनी मांडली.

– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news