

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच सरकार होऊन 23 दिवस झाले. परंतु अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे पालकमंत्री नियुक्त झाले नाहीत, त्याचा फटका सद्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
परिणामी राज्यात शिंदे सरकार आल्यापासून 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याला ईडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. राज्यात अतिवृष्टी होत असून, ओला दुष्काळ जाहीर करा, पालकमंत्री द्या, या प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.