सातगाव पठारावर आढळले दुर्मीळ शिल्प..

सातगाव पठारावर आढळले दुर्मीळ शिल्प..
Published on
Updated on

पेठ : पुढारी वृत्तसेवा : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अनेक गावांत दुर्मीळ गजलक्ष्मी व गधेगळ शिल्प आढळून आली आहेत. या परिसरात पुरातन काळातील अस्तित्व आढळून आल्याची चर्चा यामुळे येथील जुन्या पिढीतील नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
जुन्नर-आंबेगाव कट्ट्यातील सदस्यांनी ही पाहाणी केली असता सातगाव पठार भागात भावडी या ठिकाणी गजलक्ष्मी शिल्प कारेगाव येथे गधेगळ, तर पेठ या ठिकाणी गधेगळ व वीरगळ शिल्प आढळून आले. गजलक्ष्मी शिल्प हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी मंदिर, धान्याची कोठारे आदी वास्तूंवर हे शिल्प लावले जायचे.

मध्यभागी लक्ष्मी व डाव्या व उजव्या बाजूला हत्ती अशी या शिल्पाची रचना असते, तर वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दोन ते तीन फूट उंचीचा लाकडाचा किंवा दगडाचा स्तंभ. पूर्वीच्या काळी मोठ्या जमिनी दान देण्याची पद्धत होती. त्या काळचे राजे जमीन दान म्हणून देत असत या दानाचा कुणी अव्हेर केला किंवा गैरवापर केला तर त्यासाठी शापवाणी दिलेली असे. तो शाप किंवा शिवी म्हणजे गधेगळ. या शिळेमध्ये वरच्या भागात चंद्र, सूर्य कोरलेला असतो, मध्यभागी शिलालेख आणि जो आज्ञा पाळणार नाही त्यासाठी शिवी म्हणून सर्वात खाली गाढव स्त्रीवर अत्याचार करतानाचे शिल्प कोरलेले असते.

गावची सीमाहद्द, मंदिरे, देवराया या परिसरात पण त्या ठिकाणच्या सुरक्षिततेसाठी गधेगळ लावलेली असे. या शिल्पांचे संवर्धन ग्रामस्थांच्या मदतीने करणार असल्याचे कट्ट्याचे सदस्य सागर हगवणे यांनी सनशाईन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वसंतराव एरंडे यांच्याची बोलताना सांगितले. त्यामुळे पुरातन काळातील अनेक शिल्प अजूनही या परिसरात आढळून येतील, असे सर्व जुन्या जाणत्या नागरिकांनी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news