लॉरेन्स बिश्नोईच्या नावे सराफाकडे खंडणीची मागणी; पोलिसांकडून तपास सुरू

धमकीच्या इमेलनंतर गुन्हे शाखेकडून तपास सुरू
Pune News
लॉरेन्स बिश्नोईच्या नावे सराफाकडे खंडणीची मागणी; पोलिसांकडून तपास सुरूPudhari
Published on
Updated on

Pune News: पुण्यासह देश-परदेशात सराफी पेढी असलेल्या शहरातील एका प्रसिध्द सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावे दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. ईमेलद्वारे धमकी देत खंडणी मागण्यात आली असून या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Pune News
Maharashtra Assembly Poll: काँग्रेससमोर बंडखोरी रोखण्याचे तर भाजपसमोर इच्छुकांचे आव्हान

लॉरेन्स बिश्नोई टोळीला दहा कोटी रुपयांची खंडणी न दिल्यास बाबा सिद्धिकीप्रमाणे अवस्था करू. खंडणीची रक्कम कधी आणि कशाप्रकारे द्यायची, याबाबतची माहिती दुसरा इमेल पाठवून देऊ’, अशी धमकी इमेलद्वारे देण्यात आली. याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. खंडणीसाठी इमेल पाठविणार्‍याचा शोध घेण्यात येत आहे.

धमकीचा इमेल पाठविणारा पुणे शहर परिसरातील असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा चर्चेत आली आहे.

Pune News
Pune News: व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा दावा, पदपथांवर मात्र अतिक्रमणांचे पेव

बिष्णोई सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात आहे. त्याच्या टोळीच्या नावे दिल्ली, चंदीगडमधील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यात आल्याच्या घटना घडल्या. सिद्दिकी खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत नऊ जणांना अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news