Pune News: व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा दावा, पदपथांवर मात्र अतिक्रमणांचे पेव

13 हजार व्यावसायिकांचे पुनर्वसन केल्याची महापालिकेची माहिती, झोन सोडून अनेक व्यावसायिक मूळ जागेवर
Pune News
व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा दावा, पदपथांवर मात्र अतिक्रमणांचे पेवPudhari
Published on
Updated on

Pune Latest News: शहरातील तेरा हजार पथविक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल व फेरीवाल्यांचे 525 झोनमध्ये पुनर्वसन केल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर अतिक्रमणांचे पेव फुटल्याचे दिसते. त्यामुळे महापालिकेने केलेले पुनर्वसन आणि झोन केवळ कागदावरच आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होतो.

शहरात महापालिकेकडून 201 फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार शहरात बायोमेक्ट्रिक सर्वेक्षण करून अ, ब, क, ड, इ अशी व्यावसायिकांची वर्गवारी करून त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. शहरात जवळपास 24 हजार नोंदणीकृत पथारी व्यावसायिक आहेत.

Pune News
Pune News: पुणे ड्रग प्रकरणात आता सीबीआयची एन्ट्री; आतापर्यंत 16 जण अटकेत

यामध्ये महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 32 गावांमधील पथ व्यावसायिकांचा समावेश नाही. अनधिकृत व्यावसायिकांची संख्या किती आहे, हे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनाही सांगता येत नाही. एक ते दीड हजार व्यावसायिक फेरीवाले आहेत.

या अनधिकृत फेरीवाल्यांवर आणि पदपथांवर अतिक्रमण करणार्‍यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाते. तरीही रस्त्यांवर व पदपथांवर व्यावसायिक अतिक्रमण करतात. त्यामुळे पादचार्‍यांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पथ विक्रेत्यांचा सर्व्हे करून त्यांचे विविध झोनमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला आहे.

Pune News
Maharashtra Dams: राज्यातील धरणसाठा 88 टक्के; सर्व धरणे ‘हाऊसफुल्ल’

अतिक्रमण अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील 13 हजार व्यावसायिकांचे 525 झोनमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. उर्वरित व्यावसायिकांचे पुनर्वसन करणे बाकी आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे रस्त्याच्या शेजारील गल्ल्यांमध्ये फूड झोन करून तेथे पुनर्वसन केल्याचा दावा अतिक्रमण विभागाचे अधिकारी करत आहेत.

मात्र, पुनर्वसन झाल्यानंतरही अनेक व्यावसायिकांकडून झोनमध्ये दिलेली जागा सोडून पुन्हा जुन्याच ठिकाणी व्यवसाय केला जातो. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर अतिक्रमणांचे पेव फुटल्याचे चित्र दिसते. याला अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची हप्तेखोरीही कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news